कंगनाच्या मुद्यावर माकन यांनी फडणवीसांना मारला ‘हा’ टोमणा; पहा काय केलेय ट्विट

दिल्लीमधील काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते अजय माकन यांनी कंगना-कंगना असा राग आलापित असताना नागरिकांच्या महत्वाच्या मुद्यावर मुग गिळून बसलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मस्त टोला हाणला आहे.

माकन यांनी एक बातमीची इमेज पोस्ट करून ट्विटरवर म्हटले आहे की, फडणवीस साहेब तुम्ही फ़क़्त अभिनेत्री कंगना राणावत यांच्या महालाच्या मुद्द्यावर बोलत राहा. त्याचवेळी आम्ही लाखो-करोड गरीब आणि झोपडीत राहत असलेल्या गरिबांचे छत वाचवण्याची लढाई लढतो. कृपया, तुमचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनाही याबाबत काहीतरी शिकवा. कारण, देशाच्या राजधानीचा हा विषय आहे.

त्यावर आता देवेंद्र फडणवीस कोणते उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here