ब्रेकिंग : पुण्यातील लॉकडाऊनबाबत महापौरांनी दिली ‘ही’ माहिती; वाचा महत्वाची बातमी

पुणे :

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन केला जाणार असल्याच्या अफवा आणि बातम्या झळकत आहेत. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी असा कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे म्हटले आहे.

त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, पुणे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांच्या जुन्या बातम्यांच्या क्लिप्स व्हायरल करुन पसरवली जात आहे. या माहितीत कोणतेही तथ्य नसून पुणे महापालिका आणि प्रशासनाच्या पातळीवर असा कोणताही विचार नाही. आपल्यास असे संदेश आल्यावर ते पुढे पाठवण्याचे टाळावे.

त्यावर पवन दलाल यांनी सल्ला देताना म्हटले आहे की, अण्णा, मला वाटते आपण सर्व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुमचे वय कितीही असो, चांगला आहार, व्यायाम, पाणी आणि झोप घेऊन 10-15 दिवसात immunity वाढवणे शक्य आहे. ह्यासाठी आपल्याला प्रशासकीय स्तरावर काय जनजागृती करता येईल त्यादृष्टीने सुद्धा विचार व्हावा. तर, श्रीकांत गायकवाड यांनी फोटो टाकून प्रश्न केला आहे की, कर्वेनगरमध्ये पत्रे का लावले आहेत.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here