ब्रेकिंग : मुंबई पोलिसांना शरद पवारांनी दिला ‘तो’ सल्ला; पहा काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली :

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई पोलिसांना सल्ला दिला आहे. त्यांनी अमलीपदार्थ आणि त्याबाबत पोलिसांनी करण्याच्या कारवाईबद्दल माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विटरवर बैठकीतील मुद्दे टाकले आहे. त्यात म्हटले आहे की, सुशांत सिंह प्रकरणामुळे समोर आलेल्या ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. तरुण पिढीमध्ये अशी व्यसनाधीनता वाढवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे थांबायला हवं. यात तरुणांचे पालक व मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

तसेच भारत-चीन सीमावाद आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, लडाख व सीमाभागात असलेली परिस्थिती, तेथील तणाव याबाबतची माहिती आमच्यासमोर ठेवण्यात यावी अशी अपेक्षा आहे. या स्थितीत सरकारवरील टीकेपेक्षा देशाच्या लढाऊ सेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आम्हाला आवश्यक वाटते. देशाच्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत हे मुद्दे मी मांडेन. मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर अध्यादेश काढणे हा मार्ग असू शकतो. कायदेशीर सल्लागारांनी हे संमत केले तर कोणी आंदोलन करण्याची भूमिका घेईल, असे मला वाटत नाही. मराठा आरक्षणात केंद्र आणि राज्य सरकार असा वाद आणण्याची गरज नाही, असे माझे मत आहे.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here