ब्रेकिंग : मोदी सरकारवरील टीकेपेक्षा सैन्यदल महत्वाचे; पहा पवारांनी काय म्हटलेय लडाख मुद्द्यावर

दिल्ली :

लडाखमधील सीमावर्ती भागात सध्या चीन सैन्य आणि भारतीय सैन्य यांच्यातील तणावाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी मोदी सरकारवरील टीकेपेक्षा सैन्यदल महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी म्हटले आहे की, लडाख व सीमाभागात असलेली परिस्थिती, तेथील तणाव याबाबतची माहिती आमच्यासमोर ठेवण्यात यावी अशी अपेक्षा आहे. या स्थितीत सरकारवरील टीकेपेक्षा देशाच्या लढाऊ सेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहणे आम्हाला आवश्यक वाटते. देशाच्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत हे मुद्दे मी मांडेन.

ट्विटरवर पत्रकारांच्या बैठकीचे मुद्दे पवार यांनी लिहिलेले आहेत. त्यात मराठा आरक्षणाबाबत म्हटले आहे की, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला ५० टक्क्यांवर अधिकचे १० टक्के आरक्षण देण्यासाठी संसदेत कायद्यात सुधारणा करण्यात आली. हा निर्णयही न्यायालयाधीन असल्याने तो काही वेगळा लागेल, असे वाटत नाही. पण तरीही हे आरक्षण कसे टिकेल व मुलांना न्याय कसा मिळेल, यावर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here