मराठा आरक्षणाबाबत पवार म्हणाले की; वाचा त्यांचे महत्वाचे मुद्दे

दिल्ली :

दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि इतर विषयावर आपली भूमिका मांडली आहे.

त्यांनी ट्विटरवर मुद्दे टाकताना म्हटले आहे की, दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि देशातील विविध घडामोडींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर माझी मते व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर अध्यादेश काढणे हा मार्ग असू शकतो. कायदेशीर सल्लागारांनी हे संमत केले तर कोणी आंदोलन करण्याची भूमिका घेईल, असे मला वाटत नाही. मराठा आरक्षणात केंद्र आणि राज्य सरकार असा वाद आणण्याची गरज नाही, असे माझे मत आहे.

तसेच पुढे त्यांनी म्हटले आहे की, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला ५० टक्क्यांवर अधिकचे १० टक्के आरक्षण देण्यासाठी संसदेत कायद्यात सुधारणा करण्यात आली. हा निर्णयही न्यायालयाधीन असल्याने तो काही वेगळा लागेल, असे वाटत नाही. पण तरीही हे आरक्षण कसे टिकेल व मुलांना न्याय कसा मिळेल, यावर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here