उदयनराजेंनी राज्य सरकारला दिला ‘तो’ इशारा: वाचा मराठा आरक्षणाबाबत उदयनराजेंची भूमिका

सातारा :

सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पदव्युत्तर प्रवेशाबाबतच्या नियमांत बदल करता येणार नाही. एकूणच आता परिस्थिती पाहता या मुद्द्यावरून राजकारण होण्याची शक्यता आहे. विविध नेते यावरून भाष्य करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उदयनराजे म्हणाले की, मी सरकारला एकच सांगू इच्छितो. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अद्यादेश काढावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे.

मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढ्यात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे, असेही पुढे त्यांनी सांगितले.

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या विषयावर सलग ५ मिनिटं बोलून दाखवावं’, असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री ठाकरेंना दिले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here