अयोध्याही उतरली कंगनाच्या बाजूने; पहा काय धमकी दिलीय पुजारी आणि विश्व हिंदू परिषद यांनी

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपची ‘भारत की बेटी’ असलेल्या कंगना राणावत यांना पाठींबा देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत न येण्याची धमकी दिली आहे. पुजारी आणि विश्व हिंदू परिषद यांनी कंगना यांच्या बाजूने आखाड्यात उडी घेतल्याने आता हे प्रकरण आणखी जास्त चर्चेत येणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सरकारवर आणि शिवसेना आणि महाराष्ट्र राज्य यांच्यावर कंगना तोंडसुख घेत आहेत. त्याचवेळी याला महाविकास आघाडी सरकार विरुध्द भाजप असे रंग भरण्यात आलेले आहेत. एकूणच प्रादेशिक अस्मिता आणि धार्मिक अस्मितेत राज्याचे आणि देशाचे प्रश्न मागे पडून कंगना हा मुद्दा विश्वव्यापी बनला आहे. त्यामध्ये उडी घेत अयोध्येतील पुजारी व महंत यांनी ठाकरे यांना अयोध्येत यापुढे स्वागत न करण्याची धमकी दिली आहे.

अखिल भारतीय अखाड़ा परिषद यांचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी, हनुमान गढ़ी मंदिर येथील पुजारी महंत राजू दास, महंत कन्हैया दास आदींनी कंगना ही भारताची बेटी असून तिला ठाकरे सरकारने दिलेला त्रास चुकीचा असल्याचे म्हटले आहे. एकूणच राजकीय पक्षांसह आता धार्मिक पुढारी आणि संघटना यात उतरल्याने ठाकरे सरकारपुढील समस्या आणखी वाढल्या आहेत.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here