म्हणून ट्विटरवर आला राष्ट्रीय बेरोजगार दिवसाचा ट्रेंड; पहा काय आहे संतापामागे कारण

एकीकडे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडलेली असतानाच अर्थव्यवस्था गाळात गेलेली आहे. अशावेळी वाढत्या बेरोजगारी आणि शिक्षणामध्ये निर्माण झालेल्या समस्येशी काहीही देणेघेणे नसल्यागत केंद्र आणि राज्यातील सरकारे आपापल्या पद्धतीने मश्गुल आहेत. त्यावरील संताप व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर राष्ट्रीय बेरोजगार दिवसाचा ट्रेंड तरुणांनी केला आहे.

एसएससीमध्ये (staff selection commission) सुधारणा करण्यासह तरुणांच्या भविष्याशी सरकारने न खेळण्याचे आवाहन याद्वारे तरुण करीत आहेत. परीक्षांच्या आणि नोकर भरतीच्या तारखा जाहीर करण्याचीही मागणी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्य सरकारांना प्रश्न विचारून नोकऱ्या कुठे गायब झाल्या असे प्रश्न यानिमिताने विचारले जात आहेत. एकूणच आता तरुणांच्या भावनेचा बांध सुटत चालल्याचे हे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here