म्हणून राणेंनी केली आघाडीवर जळजळीत टीका; पहा काय करून दाखवलेय शिवसेनेनं

मुंबई :

सध्या जगातील एकूण करोना रुग्णांच्या आकडेवारीची आणि महाराष्ट्राची देश म्हणून तुलना केल्यास राज्य खूप आघाडीवर आहे. त्याच मुद्याला पकडून माजी खासदार व भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये ट्विटरवर म्हटले आहे की, चिवसेनेने करून दाखवलं… कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी. रुग्णसंख्या १० लाखांच्या जवळ. हे सरकार विसरलं की कोरोनाशी लढायचं होतं कंगनाशी नाही.

त्यावर कुमार चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, आपला शिवरायांचा महाराष्ट्र आहे आपल्या महाराजांनी शत्रुच्या स्त्रियांचाही आदर केला आणि राज्य सरकार महिलांचा अपमान करून अपशब्द बोलत आहे. त्यात विनाकारण जनता भरडली जात आहे. कोरोनाच्या संकटात आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. लाज वाटली पाहीजे राज्य सरकारला.

तर, संतोष कांगणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सरकारने ठरवल आहे आपण करोणाच्या बाबतीत आपली तुलना भारतातील राज्यांसोबत नव्हे तर जगातील देशांसोबत करायची आहे.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here