वंचित भूमिहीनांचा आधार होते आचार्य विनोबा; जन्मदिनानिमित्त वाचा स्पेशल स्टोरी

विनायक नरहरी भावे उर्फ विनोबा भावे यांचा आज जन्म दिवस आहे. त्यांचा जन्म हा रायगड जिल्ह्यातील गागोदे येथे झाला. आचार्य विनोबा भावे नावाने त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. त्यांचा जन्म हा ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला. आपला उभा जन्म लोकांची सेवा करण्यात त्यांनी अर्पण केला होता. त्यांना अगोदर विनायक नावाने सगळे बोलत असत. मात्र एकदा महात्मा गांधी यांनी त्यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रा मध्ये विनोबा असा प्रेमाने उल्लेख केला तेंव्हा पासून विनायक चे नामकरण झाले. उभा भारत त्यांना विनोबा म्हणूनच ओळखायला लागला. सध्या पण ते विनोबा या नावानेच सर्व परिचित आहेत. 

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्या बरोबर विनोबा भावे यांनी पण सहभाग घेतला होतो. फक्त सहभाग नाही तर त्यांना १९३२ साली तुरुंगवास भोगावा लागला. मात्र गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेला हा माणूस थांबला नाही. इतकेच नाही तर भारत पाक फाळणी नंतर १९४८ साली स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विनोबा भावे यांना दिल्लीला बोलावून घेतले. त्यांना भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेल्या लोकांना दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना विनोबा भावे यांना बोलावले होते. त्यांच्या शब्दाची, धीर देण्याची क्षमता अफाट होती. गांधीजींच्या विचारांनी गांधीजींच्या पाऊल वाटेवर चालणारा हा आचार्य. 

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

१५ एप्रिल १९५१ ला साम्यवादी हिंसात्मक चळवळी ने तेलंगणा त्रस्त झाले होते. त्याचे वेळी शांततेचा संदेश देण्याचा हेतूने आचार्य विनोबा भावे यांनी पद यात्रा काढली. हीच यात्रा पुढे भूदान चळवळ म्हणून उभा राहिली. इथूनच चळवळीची ठिणगी पडली होती. विनोबा  भावे यांनी ही जी चळवळ उभा केली तिला उभ्या भारतातून प्रतिसाद मिळाला. बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आंध्रप्रदेश आदी राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शांततापूर्ण मार्गाने वाटचाल करत असताना ज्यांच्याकडे मोठ्या संख्येने जमिनीची मालकी होती अशा जमीनदारांनी भूमिहीन लोकांना देण्याचे आवाहन केले. हजारो ऐक्कर जमीन त्या वेळी भूदान म्हणून देण्यात आली. हेच या विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीचे यश होय. महात्मा गांधी यांच्या विचारांना घेऊन पुढे चालताना कृतिशील रित्या बदल करून त्यांनी इतिहासातील व्यापक चळवळ उभा केली आणि सौ टक्का रिझल्ट पण दिला !

आज आचार्य विनोबा भावे यांची जयंती. त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

संपादन : गणेश शिंदे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here