मराठा आरक्षणाच्या विषयावरून चंद्रकांत पाटीलांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिले ‘हे’ आव्हान

मुंबई :

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. तसेच पदव्युत्तर प्रवेशाबाबतच्या नियमांत बदल करता येणार नाही. मराठा आरक्षणाला चालू वर्षी मिळालेल्या स्थगितीवरून आता विविध चर्चा चालू आहेत. तसेच या विषयावरून आता मोठे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या विषयावर सलग ५ मिनिटं बोलून दाखवावं’, असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री ठाकरेंना दिले आहे.

मराठा आरक्षण विषयावरून आता समाजमाध्यमांमध्ये विविध ट्रेंड चालू आहेत. दरम्यान  कर्जत जामखेडचे आमदार व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाची पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित पवारांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं १०% आरक्षण हे दोन्हीं प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाकडं सोपवले. पण तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here