‘त्या’ शिवसेना उपनेत्याने फडणवीसांना सुनावले; तुमच्या अहंकारानेच ‘त्यांचा’ घात केला पंत…

मुंबई :

सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारला घेरले. आरे कारशेडविषयी बोलत असताना फडणवीस म्हणाले की, राज्य अहंकारासाठी नाही, ते जनकल्याणासाठी चालवायचं असतं. यावरून शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. जाधव यांनी ट्वीट करत म्हटले की, अनाजी पंत, “इगो”च्या भाकडकथा तुम्ही सांगूच नका. एकनाथ खडसेंचे काय झाले ? पंकजा ताई का रुसल्या ? संभाजी पाटील निलंगेकर का रडले ? विनोद तावडे का मागे पडले ? बावनकुळेचा गेम कुणी केला ? तुमच्या “अहंकारानेच” सर्वांचा घात केला पंत…

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठीhttps://amzn.to/34Iqf7kयावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

या ट्वीटवर विविध प्रकारच्या प्रतीक्रिया आल्या आहेत. विजय लिपारे यांनी म्हटले आहे की, तडफडणवीसांनी स्वत:च्या अहंकारापायी पक्ष रसातळाला न्यायची मुहूर्तमेढ रचली आहे. सतत खोटे बोलणे, दिलेला शब्द न पाळणे मीच काय तो खरा आणि बाकीचे सर्व चुकीचे हे धोरण तुम्हाला एक दिवस नेऊून नक्की बुडविणार. जनता सूज्ञ आहे तुमची सत्तेसाठी तडफड पाहत आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here