मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रोहित पवारांनी केली ‘ही’ महत्वाची पोस्ट; वाचा अधिक

अहमदनगर :

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. तसेच पदव्युत्तर प्रवेशाबाबतच्या नियमांत बदल करता येणार नाही. मराठा आरक्षणाला चालू वर्षी मिळालेल्या स्थगितीवरून आता विविध चर्चा चालू आहेत. अशातच कर्जत जामखेडचे आमदार व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाची पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

रोहित पवारांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती ही आपल्यासाठी धक्कादायक बाब आहे. मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं १०% आरक्षण हे दोन्हीं प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाकडं सोपवले. पण तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे.

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

पुढे त्यांनी राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत असल्याचेही म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, सरकारही पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मी पाहतोय. तसंच आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी घटना पीठाकडं पाठवण्याची मागणीही आपणच केली होती. लाखो युवांच्या भावनेचा व भविष्याचा हा प्रश्न असून अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल, असा विश्वास आहे.

मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडत असताना पवारांनी थेट सल्ला दिला आहे की, या विषयाचे कुणीही राजकारण करु नये.

संपादन : स्वप्नील पवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here