चीनबरोबरच्या अडीच तासांच्या बैठकीत पाच मुद्द्यांवर सहमती; वाचा महत्वाची बातमी

भारत-चीन सीमावाद गंभीर वळणावर असल्याने आता दोन्ही देशातील प्रमुख उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी भांडण मिटवण्यास प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. त्यानुसार काल रात्री रशियामध्ये परराष्ट्रमंत्रीस्तरीय बैठक किमान अडीच तास चालली. त्यामध्ये पाक मुद्द्यांवर सहमती होत आल्याची माहिती राष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे.

रशियात झालेल्या या बैठकीन भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताची बाजू आग्रहाने मांडली. लडाखमधील सीमा भागातील तणाव पूर्णपणे मुक्त होण्यासाठी भारताचे सहकार्य राहील असे सांगतानाच चीनी सैन्याने केलेल्या आगळीकीचा मुद्दाही तयंनी मांडला. अखेर सर्व बाजूने चर्चा होऊन पाच मुद्द्यांवर सहमतीने माक करण्याचे ठरल्याची माहिती पुढे आलेली आहे.

यातील पहिला मुद्दा आहे ज्या मुद्द्यांवर मतभेद असतील ते संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करावा. हातघाईवर येण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी. दुसरा मुद्दा होता की, संवाद चालू असतानाच आता संबंधित देशातील सैन्याने पाठीमागे हटावे, तिसरा मुद्दा हा बैठकीसाठी विशेष प्रतिनिधि तंत्र यांची नियुक्ती करावी. चौथ्या मुद्द्यानुसार दोन्ही देशांनी एकमेकांचा सन्मान ठेऊन चर्चेतून निघालेला तोडगा मान्य करावा आणि अखेरीस पाचव्या मुद्द्यानुसार एलएसीवर होती तशीच संवादाची आणि मित्रत्वाची स्थिती पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांना सर्वोतोपरी सहकार्य करावे.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here