देशभरातील पशुपालक शेतकऱ्यांना टेक्नोसॅव्ही करण्यासह डिजिटल टेक्नोलॉजीशी जोडण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-गोपाला अॅप आणले आहे. केंद्रीय पशुपालन आणि डेअरी मिनिस्ट्रीच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने हे फार्मर्स फ्रेंडली अॅप्लिकेशन आणले आहे.
ई-गोपाला अॅपबाबतचे महत्वाचे मुद्दे असे :
- गुगल प्ले स्टोअरवरून कोणीही हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकतो. मोबाइल नंबर आणि इतर माहिती भरून आपण याची मोफत सेवा घेऊ शकता.
- लॉगइन पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना मोबाइल स्क्रीनवर सहा टॅब दिसतील. त्यामध्ये क्लिक करून संबंधित भागातील माहिती पशुपालकांना वाचायला आणि पाहायला मिळणार आहे.
- यातील पहिल्या भागात जनावरांच्या पोषण आणि आहार याबाबतचे मार्गदर्शन केलेले आहे. तर, दुसऱ्या भागात जनावरांसाठी लागणाऱ्या आयुर्वेदिक औषधांची माहिती दिलेली आहे.
- तिसऱ्या भागात पशु आधार यावर क्लिक करून आपण आपल्या जुन्या-नव्या जनावरांची माहिती पाहू शकतो. यामध्येच आपण आपल्या जनावरांची नोंदणीही करू शकता.
- पुढील माय अलर्ट या टॅबमध्ये लसीकरण आणि इतर आजार यासाठी करावे लागणारे उपचार यांची माहिती मिळेल. जवळच कुठेही लसीकरण अभियान राबवले जाणार असल्यास त्याचेही अपडेट इव्हेंट यामध्ये दिसतील.
- तर, पशु बाजार या टॅबमध्ये नजीकचे कृत्रिम रेतन केंद्र आणि वीर्य सेंटर यांची माहिती मिळणार आहे.
अशा पद्धतीने पशुपालक शेतकऱ्यांना खूप महत्वाची माहिती देणारे हे मोबाइल अॅप्लिकेशन केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेले आहे. आपण सगळेजण त्याचा लाभ घ्या. यामध्ये काहीही सूचना करायच्या असल्यास आपण गुगल प्ले स्टोअर यावरही याबाबत प्रतिक्रिया देऊ शकता.
संपादन : सचिन मोहन चोभे