स्वस्तात घर आणि दुकाने खरेदी करण्याची आलीय संधी; वाचा महत्वाची बातमी

कर्ज घेतल्यावर पुन्हा परतफेड करण्यात अयशस्वी ठरलेल्या दुकाने, घर आणि फ्लॅट यांच्या खरेदीची नामी संधी चालून आलेली आहे. होय, संधी चालून आलीय हे नक्की. मात्र, आपल्याकडे जर पैसे नसतील तर तिला संधी तरी कसे म्हणणार म्हणा. पण, तुम्हाला नाही तर तुमच्या मित्र, मैत्रिणी व नातेवाईक आणि आप्तेष्ट यांना या माहितीचा उपयोग होणार असल्यास त्यांनाही ही माहिती शेअर करा की.

तर, वाचक मित्र-मैत्रिणींनो, पंजाब नॅशनल बँक यांनी ही संधी दिलेली आहे. कर्ज घेऊन वेळेत परतफेड न करता पुन्हा बँक शाखेचे तोंड न पाहण्याची तसदी घेणाऱ्या ग्राहकांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. दि. १५ ते २९ सप्टेंबर २०२० या कालावधीत ही राष्ट्रव्यापी लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याची संपूर्ण माहिती https://etender.pnbnet.in:8443/banks/detail/pnb/MTQy या लिंकवर किंवा डिटेल्ड नोटिस https://www.pnbindia.in/EAuction.aspx यावर उपलब्ध आहे.

आपल्याला जर तुमच्या नजीकच्या भागात कुठेही आवडते घर किंवा दुकान घ्यावेसे वाटले तर https://ibapi.in यावर जाऊन आपली नावनोंदणी करून घ्या. बिडर म्हणून नोंद करताना मोबाइल नंबर आणि इतर केवायसी डीटेल्स काळजीपूर्वक भरून घ्या. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर EMD (अर्नेस्ट मनी जमा) म्हणून द्यावी लागणारी फी ऑनलाईन पद्धतीने भरून आपण यामध्ये सहभागी होऊ शकता. संबंधित मालमत्तेच्या लिलावासाठी कमीतकमी दिलेली रक्कम यापेक्षा जास्त आपण बीड लावू शकता.

संपादन : माधुरी सचिन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here