ओळख ज्ञानपिठाची : “ज्ञानसेवमृतम”द्वारे छत्रपतींचा विचार वाढवणारे शिवाजी विद्यापीठ; वाचा माहिती

टीम कृषीरंग शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था आणि देशातील प्रमुख खासगी संस्था यांच्या माहितीचा खजिना ‘ओळख ज्ञानपिठाची’ या लेखमालेतून वाचकांसाठी घेऊन येत आहे. पुढील काळात आपण महाराष्ट्र, त्यानंतर भारत आणि अखेरीस जगभरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांची माहिती पाहणार आहेत. या लेखमालेची सुरुवात आम्ही छत्रपती शिवरायांना वंदन करून करीत आहोत. आपणास ही लेखमाला कशी वाटली किंवा इतर काही सूचना असतील तर आम्हाला krushirang@gmail.com या इमेलद्वारे कळवा.

कोल्हापूर शहरात असणार्‍या नामवंत अशा “शिवाजी विद्यापीठ” या ज्ञानपिठाची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. १९६२ साली राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते या ज्ञानपिठाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दक्षिण महाराष्ट्रात एक विद्यापीठ असावे अशी मागणी त्यावेळी झाली होती. याबाबतीत प्राचार्य तवाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याचा सखोल अभ्यास करून अहवाल बनवला. हा अवहाल तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला. मग, महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी या विद्यापीठाला “शिवाजी विद्यापीठ” हे नाव सुचवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अवघ्या जगासाठी प्रेरणादायी आहे. चव्हाण साहेबांनी तेच लक्षात घेऊन या विद्यापीठाला महाराजांचे नाव दिले.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा असे तीन जिल्हे येतात. तसेच या विद्यापीठाचे ब्रीद वाक्य हे “ज्ञानसेवमृतम” असे आहे. या विद्यापीठाची स्थापना ही अगदी सहज झाली असे नाही तर या विद्यापीठासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या विद्यापीठाच्या पाठीमागे एक भक्कम असा आधार स्तंभ उभा होता त्याचे नाव हे कोल्हापूरकर आजही तितक्याच आदराने घेतात. त्यांचे नाव आहे लोकनेते बाळासाहेब देसाई. त्यांच्याच प्रयत्नातून हे विद्यापीठ उभे राहिले. त्यावेळी सगळ्या कोल्हापुरातील जनतेने विद्यापीठ व्हावे यासाठी एकोप्याने आणि जिद्दीने हे स्वप्न पूर्ण केले होते. त्याची माहिती सांगताना आजही कोल्हापूरकरांना अभिमान वाटतो.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

विद्यापीठ मंजूर झाले येवढ्यावरच थांबतील ते स्वाभिमानी कोल्हापूरकर कसले. ट्रकभरून रोज सकाळी पैलवान काम करायला यायचे आणि सूर्य मावळायच्या वेळी जायचे. त्यांनी चक्क यासाठी एक-एक रुपया वर्गणीचे कूपन काढली होती. गावोगावी पायी जाऊन, कोणी सायकलवर जाऊन ही कुपन वाटली आणि निधि गोळा केला होता. मात्र, जिद्दीला पेटलेल्या कोल्हापूरच्या नागरिकांनी सन्मानाने हे “शिवाजी विद्यापीठ” उभे केले.

त्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्या आग्रहास्तव विद्यापीठाला “शिवाजी विद्यापीठ” हे नाव देण्यात आले. या नावाच्या मागील त्यांची हीच भूमिका असली पाहिजे की कोणतेच नाव मोठे झाले की त्याचा शॉर्टकट वापरला जातो पूर्ण नाव उच्चारले जात नाही. मग शोर्टफॉर्म फॉर्मात येतो आणि अखेरीस बोलीभाषेतील हीच ओळख विद्यार्थ्यांच्या मनावर पक्की होते. महाराजांचे नाव येण्यासह त्यांचा विचार आणि शिकवण या नावातून अपोआपच विद्यार्थ्यांमध्ये रुजते. हेच या निमित्ताने वाटते. बाकी, छत्रपतींचा विचार रुजणे आणि रुजावान्यासह मोठा करण्याचे काम करणारी ही संस्था अशीच उत्तरोत्तर बहरत जावो हीच सदिच्छा..!

लेखक : गणेश शिंदे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here