‘त्या’ गुंतवणूकयोग्य शेअरवर लक्ष ठेवा; कारण, मिळू शकते मस्तपैकी ग्रोथ

करीना विषाणूचा लॉकडाऊन संपत आलेला आहे. आता अनलॉक कालावधीत अनेक कंपन्यांना नवी उभारी मिळत आहे. अशावेळी काही शेअरवर योग्य लक्ष ठेऊन योग्य वेळी गुंतवणूक केल्यावर चांगली ग्रोथ मिळू शकेल असा विश्वास एंजल ब्रोकिंग लिमिटेडच्या इक्विटी स्ट्रॅटजिस्ट विभागाचे डीव्हीपी श्री ज्योती रॉय यांनी प्रेसनोटमध्ये व्यक्त केला आहे.

हिरो मोटोकॉर्प यास ३४२२ रुपये टार्गेट होईल असे त्यांना वाटते. या दुचाकी कंपनीच बाजारातील वाटा ५४ % आहे. करोनामुळे सार्वजनिक वाहतुकीवरून खासगी वाहनांवर शिफ्टींग झाल्यामुळे ग्रामीण भागात एंट्री लेव्हलच्या मोटरसायकलची विक्री वेगाने वाढेल असे दिसते. तसेच चांगला पाउस पडल्याने आता भविष्यात ही कंपनी आणखी जोमाने गाड्या विकेल असेच चित्र आहे.

माहिती-तंत्राज्ञानाची महत्वाची कंपनी असलेली परसिस्टंट सिस्टिम्स यास टार्गेट १,२७६ रुपये देण्यात आलेले आहे. हायटेक, मॅन्युफॅक्चरिंग व लाइफ सायन्स या प्रभावित क्षेत्रांमध्ये कंपनी काम करते. कंपनीने खर्च नियंत्रित करून मार्जिनमध्ये सुधारणा केली आहे.

रेडिको खेतान ही इंडियन मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल) मधील अग्रगण्य निर्माता कंपनी आहे तिचे टार्गेट ५१४ रुपये अचिव्ह होईल असे दिसते. मॅजिक मोमेंट्स व्होडका आणि 8PM प्रीमियम ब्लॅक व्हिस्कीसारख्या प्रीमियम ब्लॅक व्हिस्कीसारख्या ब्रँड्सच्या वाढत्या विक्रीसह उद्योग १२% वृद्धीने विस्तारला आहे. स्पर्धकांच्या तुलनेत ही कंपनी मजबूत स्थितीत आहे.

जेके लक्ष्मी सिंघानिया समूहाद्वारे समर्थित जेके लक्ष्मी सिमेंट ही एक चांगली कंपनी आहे. उत्पदान क्षमता १३.३ दशलक्ष टन एवढी आहे. जेके लक्ष्मी ही मिडकॅप सिमेंट क्षेत्रातील आमची टॉप पिक आहे. ऐतिहासिक प्रमाणानुसार, पीअर ग्रुपच्या तुलनेत ती महत्त्वपूर्ण सवलतीत व्यापार करत आहे. त्यामुळे ती  ३२८ रुपये टार्गेट अचिव्ह करेल असे वाटते.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

एचसीएल टेक्नोलॉजीज यांच्याकडे एडीएम, एंटरप्राइज सोल्यूशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सर्व्हिसेस इत्यादीसारख्या सेवांची एक विस्तृत श्रेणी आहे. सध्याच्या किंमतींवर हा शेअर, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या इतर मोठ्या भांडवलाच्या आयटी कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण सवलतीवर व्यवसाय करत आहे. तसेच कंपनीची स्थिती लक्षात घेता ती ७९३ रुपये इतके लक्ष्य पार पार करेल असे वाटत आहे.

एकूणच वरील कंपन्यांबाबत आलेल्या बातम्या, गॉसिप आणि सल्ला यावर अजिबात १०० टक्के विश्वास ठेऊ नका. आपल्या पद्धतीने या कंपन्यांचा ताळेबंद आणि इतर माहितीचा अभ्यास करूनच इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घ्या.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here