‘त्या’ ५ शेअरद्वारे मिळू शकतील चांगले पैसे; पहा त्यांची यादी आणि इतर माहिती

लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या आर्थिक घडामोडी सुरू झाल्यामुळे बाजारात सुधारणा अपेक्षित आहे. अशावेळी अॅग्रोकेमिकल्स, आयटी, टेलिकॉम, दुचाकी आणि ट्रॅक्टर्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, हॉटेल्स आणि मल्टीप्लेक्स या क्षेत्रांत वाढ पाहायला मिळू शकते असा अंदाज एंजल ब्रोकिंग लिमिटेडच्या इक्विटी स्ट्रॅटजिस्ट विभागाचे डीव्हीपी श्री ज्योती रॉय यांनी प्रेसनोटमध्ये व्यक्त केला आहे.

यातील पहिला शेअर आहे इन्ड्युरन्स टेक्नोलॉजीज हा. याचे लक्ष्य टार्गेट १,३१६ रुपये होऊ शकते. कारण भारतासह युरोपमध्ये कार्यरत असलेली ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स उत्पादन करणारी मोठी कंपनी आहे.

या यादीमध्ये स्वराज इंजिन्स यांनाही स्थान आहे. त्यांच्या ट्रॅक्टर्सची मागणीदेखील भरपूर वाढली आहे. आगामी काळात त्यात आणखी मोठी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे याचे टार्गेट १,८९२ रुपये देण्यात आलेले आहे. स्वराज इंजिन ही कंपनी डिझेल इंजिन आणि हाय-टेक इंजिन कंपोनंटचा व्यवसाय करते. रबी पिकांमध्ये चांगले उत्पादन, एमएसपीमध्ये वृद्धी आणि सामान्य मान्सूनमुळे स्वराज इंजिनला फायदा होईल. सध्याच्या काळात स्वराज इंजिनचे ऐतिहासिक मूल्यांकन केल्यास गुण देण्यास भरपूर वाव आहे.

हॉकिन्स कूकर ही घराघरात पोहोचलेली कंपनी आहे. तिचेही टार्गेट ५,५५६ रुपये अचिव्ह होऊ शकते. दोन वर्षांत कंपनीने कूकर आणि कूकवेअर सेगमेंमधील विक्रीतील वृद्धी १३% विरुद्ध ४% एवढी करून टीटीके प्रेस्टीज (मार्केट लीडर) ला मागे टाकले. मागील वित्त वर्षात एलपीजी मागणी आणि वापर वाढला आहे. बाजारातील मजबूत स्थितीसह एकूणच ग्राहकांच्या विश्वासामुळे ही कंपनीही गुंतवणुकीस योग्य वाटते.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

भारतीयांची आवडती कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला २,३६६ रुपये हे टार्गेट देण्यात आलेले आहे. कंपनी त्याच्याजवळ नक्कीच जाईल असे दिसते.  रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायांमध्ये आणि जिओ प्लॅटफॅर्ममध्ये झालेली मोठी गुंतवणूक यामुळे जगाचे लक्ष या कंपनीकडे आहे. पुढील ३-५ वर्षांमध्ये डिजिटल आणि रिटेल व्यवसायाच्या संभाव्य यादीत दीर्घकालीन शेअरधारकांसाठी महत्त्वाच्या व्हॅल्यू अनलॉकिंगचे कारण बनेल.

मेट्रोपोलिस हेल्थकेअर यांनाही २,१५६ रुपये हे टार्गेट सहजपणे अचिव्ह होईल असे दिसते. कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी अपेक्षित आकडेवारीपेक्षा चांगली प्रगती केली आहे. कंपनीचा नॉन कोव्हिड रिव्हेन्यू प्री-कोव्हिड पातळीच्या ८० टक्क्यांनी वर आहे.

एकूणच वरील कंपन्यांबाबत आलेल्या बातम्या, गॉसिप आणि सल्ला यावर अजिबात १०० टक्के विश्वास ठेऊ नका. आपल्या पद्धतीने या कंपन्यांचा ताळेबंद आणि इतर माहितीचा अभ्यास करूनच इन्व्हेस्टमेंट करण्याचा निर्णय घ्या.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here