अंबानींची कमाल.. रिलायन्स बनली मालामाल; २०० अब्ज डॉलरवाली पहिली कंपनी बनण्याचा मिळवला मान

स्व. धीरूभाई अंबानी यांच्यानंतर सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रिलायन्स हे नाव जगभरात नेले आहे. मागील सहा महिन्यात जगावर मोठे संकट असतानाही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळवून अंबानींच्या कंपनीने नवनवे विक्रम केले आहेत. आजही शेअर बाजारात कंपनीच्या शेअरचे भाव वाढल्याने आता ही कंपनी २०० अब्ज डॉलरवाली देशातील पहिली आणि एकमेव कंपनी बनली आहे.

रिलायन्स म्हणजे पेट्रोलियम आणि ओईल सेक्टरमधील कंपनी असा शिक्का या कंपनीवर होता.मध्ये रिटेलिंग आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये या कंपनीला काहीच विशेष करता आलेले नव्हते. मात्र, कंपनीचे दोन भाग झाल्यावर अनिल अंबानी यांची उतरती कळा लागली. त्याचवेळी मुकेश अंबानी यांनी वेग पकडला. आता तर रिलायन्स म्हणजे फ़क़्त मोठे बंधू मुकेश यांचीच असल्यागत स्थिती आहे. कारण, मुकेश यांनी वेगवान पत्ते ओपन करीत आता या कंपनीला टेलिकॉम आणि रिटेलिंग सेक्टरची बादशाह बनवण्याची तयारी केली आहे.

आजही सकाळी शेअर बाजारात नव्या बातम्यांनी आगमन केल्याने रिलायन्सच्या शेअरचे भाव ३.३२ टक्क्यांनी वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीज यासह इतर सबसिडरी कंपन्या वेगाने वाढल्याने मग अंबानींच्या या ग्रुपचे एकूण बाजार भांडवल आता २००.६८ अब्ज डॉलर इतके झालेले आहे. अशा पद्धतीने भारतातील ही बलाढ्य कंपनी आणखी बलाढ्य झाली आहे. एकूण वाढीचा वेg लक्षात घेता पुढील आर्थिक वर्षात ही कंपनी आणखी मोठी मजल मारण्याची शक्यता आहे.

बिग बाजार ताब्यात घेण्यासह फेसबुक, गुगल, मायक्रोसोफ्ट आणि इतर बड्या कंपन्यांनी रिलायन्सवर विश्वास दाखवत गुंतवणूक केल्याने नैसर्गिकरीत्या वाढीच्या वेगाच्या कित्येक पटीने मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढत आहे. आता जगातील एक दिग्गज कंपनी आणि उद्योगपती म्हणून या भारतीय कंपनी आणि तिच्या मालकाने आपली पकड आणखी मजबूत केली आहे.

संपादन : सचिन पाटील

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here