म्हणून त्या स्पर्धेचे नाव आहे रणजी करंडक; वाचा महती भारतीय क्रिकेटच्या पित्याची

आज जामनगर चे महाराजा कुमार रणजित सिंह यांचा जन्मदिवस त्यांना भारतीय क्रिकेट चे पिता म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्मदिवस त्यांचा जन्म हा १० सप्टेंबर १८ ७२ साली झाला. इंग्लंड मध्ये ते शिक्षणाच्या निमित्त गेले होते त्या वेळी त्यांनी शिक्षणाच्या बरोबरच क्रिकेट या खेळात त्यांना आवड निर्माण झाली आणि त्यांनी तो खेळ आत्मसात केला. त्यांचं खेळ इतका जबरदस्त होता की त्यांना इंग्लंड च्या टीम मध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली. महात्मा गांधी ज्या वेळी इंग्लंड ला गेले होते त्या वेळी त्यांना तीन लोकांचे नाव सांगितले होते रेफ्रस साठी. त्या मध्ये एक नाव रणजित सिंह यांचे पण होते या वरून त्यांच्या प्रसिद्धीचे वलय त्या काळी असणारे समजून घेऊ शकता. अशी संधी मिळवणारे ते आशिया खंडातील पहिली व्यक्ती ठरले. त्यांच्या खेळाच्या सन्मानार्थ रणजी करंडक ला त्यांचे नाव देण्यात आले. 

चला तर आता जाणून घेऊ या रणजी करंडक संदर्भात !

रणजी करंडक संदर्भात माहिती नाही असा चाहता नाही. क्रिकेट खेळणाऱ्या खूप लोकांचं स्वप्न असते की रणजी करंडक आयुष्यात एकदा तरी खेळायला मिळावी. भारतीय क्रिकेट मधील सन्मानाची ट्रॉफी अशी ओळख रणजी करंडक ची आहे. रणाजीचा पहिला सामना हा ४ नोव्हेंबर १९३४ साली झाला होता. हा सामना चेन्नई येथील मैदानावर मद्रास आणि मैसूर या दोन टीम मध्ये झाला होता. 

रणजी करंडक चे अगोदर नाव हे “क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया” असे होते. मात्र नंतर नाव बदलून महाराज रणजितसिंह यांचे नाव देण्यात आले. सातासमुद्रापार सध्या या रणजी सामन्याचे नाव आहे असे म्हणायला हरकत नाही. रणजी करंडक ही सर्वाधिक वेळा मुंबई च्या टीम ने जिंकली आहे. एक दोन नाही तर तब्बल ४१ वेळेस हा ट्रॉफी जिंकण्याचे रेकॉर्ड मुंबई टीम च्या नावावर आहे. सर्वाधिक धावा काढण्याचे रेकॉर्ड हे वसीम जाफर यांच्या नावावर आहे. त्यांनी १०,००० पेक्षा जास्त धावा काढून आपल्या नावावर विक्रम बनवलेला आहे.

रणजी करंडक हा एक सोनेरी पल्ला आहे क्रिकेट च्या विश्वात. अशा रणजी करंडक ला ज्यांचे सन्मानाने नाव दिले गेले अशा महाराज राजा रणजित सिंह यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

संपादन : गणेश शिंदे सरकार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here