१२० वर्षांपूर्वी चीनमध्ये जाऊन त्यांनी केला होता पराक्रम; वाचा त्यांच्या शौर्याची गाथा

सध्या भारत-चीन सीमावादाचे भांडण एकदम गंभीर टप्प्यावर आलेले आहे. सुसंवाद कमी पडला तर या दोन्ही देशांमध्ये छोटेखानी का होईना पण युद्ध होईल अशीच शक्यता आहे. अशा तणावाच्या काळात आज आपण एक खास स्टोरी वाचणार आहात. ती आहे १२० वर्षांपूर्वीची. होय, त्यावेळचीच ही शौर्यगाथा आहे. भारतीय जवानांनी केलेल्या मदतीची.

त्यावेळी चीनमध्ये यीहेक्वान नावाचा एक बॉक्सर समुदाय होता. कुंग फू फायटर असलेल्या त्या समुदायात उग्र राष्ट्रवादी तरुण आणि नागरिकांची भरती केली जात असे. त्यांनी तत्कालीन राज्यव्यवस्थेच्या विरोधात बंडाचा झेंडा रोवला होता. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी तत्कालीन ब्रिटीश एम्पायर, अमेरिका, जर्मनी, इटली, जपान, फ्रांस, रशिया आणि हंगेरी यांच्या सैन्य तुकड्यांनी त्यावेळीच हे बंड मोडीत काढले होते.

त्यासाठी राजस्थानचे जोधपुर लांसार्स, बिकानेर गंगा रिसाला आणि राजपुतांची एक तुकडी महिनाभर चीनमध्ये होती. जोधपुर लांसार्सचे नेतृत्व इदार येथील सर प्रताप सिंग यांनी तर, बिकानेरचे नेतृत्व महाराज गंगा सिंग यांनी केले होते.

बिकानेर स्टेट अर्काइव्ह यांच्या माहितीनुसार आणि कागदपत्रांच्या दस्तऐवज यानुसार महाराजा गंगा सिंग यांना १९०० मध्ये काही भारतीय सैन्याला चीनमध्ये पाठवायचे असल्याची माहिती मिळाली. मग त्यांनी स्वतःच तिकडे जाण्याची तयारी केली. महाराज गंगा सिंग १ सप्टेंबरला तिकडे निघाले आणि १४ सप्टेंबरला ते हॉंगकॉंगला पोहोचले. चीनमध्ये त्यांनी टिंस्टीन येथे उंट दलाचे नेतृत्व केले. पोंटिंगफ्यू आणि पिटांग यावरही त्यांच्या दलाने कब्जा केला होता. विजयी होऊन मागे परतल्यावर तत्कालीन राजधानी कलकत्ता येथे त्यांचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी दणक्यात स्वागत केले होते.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

बिटीश सेनेतर्फे त्यावेळी राजस्थानी सैन्य लढले होते. पाश्चिमात्य सेना त्यावेळी स्थानिक चीनी माणसांवर अत्याचार करीत होती. त्यावेळी भारतीय सैनिक त्यांना असे करू देत नव्हते. सर प्रताप सिंग यांचे सहायक अमर सिंग राठोड यांनी पर्सनल डायरीत लिहिले आहे की, रशियन सैन्य चीनी बांधवांवर अत्याचार करीत होते. पाश्चिमात्य सैन्यातील अनेकजण चीनी अबला महिलांवर अन्याय-अत्याचार करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट नमूद केले होते. नंतर त्या डायरीवर एक पुस्तकही प्रसिद्ध झाले.

२३ हजार बॉक्सर सैन्याचे बंड मोडीत काढण्यात राजस्थानी सैन्याने मोठी भूमिका पार पाडली होती. ७ सप्टेंबर १९०१ मध्ये झालेल्या बॉक्स प्रोटोकॉलच्या करारानुसार मांचू राजवटीने यासाठी ३३ कोटी रुपये दिले. विद्रोहींमुळे चीनमधील राजवंश कमजोर झाला. पुढे एका दशकभरात राजवटीचा अंत झाला.

चीनमध्ये विदेशी ताकदीला वाढता विरोध, ख्रिश्चन मशिनरीकडून चीनच्या स्थानिक परंपरा आणि चालीरीती यामध्ये हस्तक्षेप होत असल्याच्या मुद्यावरून अमेरिकन आणि जर्मन चर्चवर बॉक्सर बंडखोरांनी हल्लाबोल केला होता. तसेच चीनमध्ये असलेली आर्थिक क्षमता लक्षात घेऊन तत्कालीन बड्या राष्ट्रांनी हा हस्तक्षेप केल्याची नोंद आहे.

सोर्स : नवभारत टाईम्स आणि गुगल.कॉम

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here