मुलगा ‘तेज’ झाल्याने लालूंना आणखी दुसरा झटका; पहा काय झालेय बिहारमध्ये

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव अजूनही तुरुंगात आहेत. ते तुरुंगात असल्याने त्यांच्या पार्टीची जबाबदारी त्यांचा मुलगा तेजप्रताप यादव सांभाळत आहे. अशावेळी तेजप्रताप यांनी जास्त तोंडपाटीलकी केल्याचा मोठा फटका पक्षाला बसत आहे. तेजप्रताप यांची पत्नी निवडणूक रिंगणात उतरण्याची चर्चा असतानाच आता एका ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी पाठवली आहे.

राजदचे संस्थापक सदस्य असलेल्या रघुवंश प्रसाद यांनी एम्स रुग्णालयातील आयसीयूमधून आपला चार ओळींचे राजीनामा पत्र लालूप्रसाद यांना पाठवून दिले आहे. निवडणूक जवळ असतानाच 74 वर्षीय ज्येष्ठ नेत्याने लालूंना सोडण्याचा निर्णय जाहीर झाल्याने हजारो कार्यकर्त्यांना मोठा झटका बसला आहे. वैशाली येथील माजी आमदार रामा सिंग हे पक्षात येण्यासाठी तेजप्रताप यांना भेटत आहेत. त्याला रघुवंश प्रसाद यांचा विरोध आहे.

त्यावर बोलताना पक्ष म्हणजे एक समुद्र असतो आणि त्यातून एखाद्या लोटीभर पाणी कमी झाले तर काहीच फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया तेजप्रताप यांनी दिली होती. एका ज्येष्ठ नेत्याची तुलना लोट्याशी केल्याने हा वादाचा विषय बनला होता. लालूप्रसाद यांनी मुलगा तेजप्रताप याला यावरून झाडले होते. मात्र, तरीही त्यावर गैरअर्थ काढल्याचे सांगून रामा सिंग यांनाही पक्षात घेण्याचे तेजप्रताप यांनी जाहीर केले होते.

त्यामुळे व्यथित झालेल्या रघुवंश प्रसाद यांनी अखेर रुग्णालयात गंभीर आजारी असतानाच आपले मित्र असलेल्या लालूप्रसाद यांना चिठ्ठी लिहून राजीनामा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जननायक कर्पुरी ठाकूर गेल्यानंतर आपल्यासोबत ३२ वर्षांपासून आहे. मात्र, आता यापुढे नाही. कार्यकर्ता, जनता आणि प्रियजनांनी प्रेम दिले. मफ करावे. इतकेच पत्र त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे लालूप्रसाद यांनी एका अर्थाने एक चांगला मित्र आणि कुटुंबातील सदस्य गमावल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here