‘त्या’ क्षेत्रात वाढणार ५ कोटी नोकऱ्या; पहा गडकरींनी कोणते स्वप्न दाखवलेय ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम आणि जबाबदार मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. त्यांनी आता लघु उद्योगांना मदत करण्यासह त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार वाढविण्याचे स्वप्न ठेवले आहे.

गडकरींनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, सध्या एकूण जीडीपीमध्ये MSME चे योगदान ३० टक्के आहे. पुढील ५ वर्षांमध्ये ते ५० टक्क्यांवर नेण्याचे धोरण आहे. तसेच एकूण निर्यातीत या क्षेत्राचा असलेला वाटा ४९ टक्क्यांवरून ६० टक्के नेण्याचाही प्रयत्न आहे. सध्या हे क्षेत्र ११ कोटी रोजगार देते. पुढील पाच वर्षांमध्ये त्यात किमान ५ कोटी इतकी वाढ अपेक्षित आहे.

नव्या प्रतिभावान व्यक्तींना मदत करून त्यांना उद्योगाभिमुख करण्याचे धोरण आहे. भारतीय तरुणांनी आणि व्यावसायिकांनी नवनवीन तंत्र शोधून उत्पादन सुरू करण्याची गरज आहे. तसेच असे करताना काहींच्या चुका झाल्या तर त्यांनाही सावरण्याचे धोरण ठेवावे लागणार आहे. एकूणच छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठीचे ठोस धोरण केंद्र सरकारकडून तयार केले जात असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे.

भातापासून इथेनॉल बनवण्याच्या मुद्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपले भाष्य केले आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी छोट्या, मध्यम व लघु उद्योगांची आहे. त्यांना बळ दिले तरच अटलबिहारी वाजपेयींच्या स्वप्नातील सक्षम भारत तयार होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले अआहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here