‘त्यांनी’ मराठयांचा विश्वासघात केला; ‘या’ भाजप आमदाराचा हल्लाबोल

मुंबई :

सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. तसेच पदव्युत्तर प्रवेशाबाबतच्या नियमांत बदल करता येणार नाही, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. आता राज्यात याच विषयावरून मोठे राजकारण चालू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी ‘या सरकारनी मराठयांचा विश्वासघात केला!! आज आमच्या समाजाच भविष्य अंधारात गेले’, असे म्हणत महाविकास आघाडीसरकारवर टीका केली आहे.

राणे यांनी ट्वीट करत सांगितले की, कुठल्या तोंडानी या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्याच… कश्यासाठी?? आता मूक मोर्चे नाहीच. आता संघर्ष अटळ आहे.

राणे यांच्या या ट्वीटवर औरंगाबादचे नेटकरी राहुल पाटील यांनी म्हटले आहे की, तुम्ही पण तेच केलं होतं…विश्र्वासघात शब्दाची सुरुवात तुमच्यापासुनच झालेली..

राणे यांचे समर्थन करणाऱ्या प्रतिक्रियाही या ट्वीटवर आल्या आहेत. विनोद कदम यांनी म्हटले आहे की, मराठ्यांसाठी खुलेआम लढणारा एकमेव नेता आहे तो म्हणजे नीतेश राणे साहेब. राणेसाहेब तुम्ही नेतृत्व करा. या मराठा विरोधी भकास आघाडी सरकारला गाडायची वेळ आली आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here