उत्तर भारतीयांचा ट्विटरवर महाराष्ट्रविरोधी ट्रेंड; मुख्यमंत्र्यांवर केले जात आहेत गलिच्छ आरोप

अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुंबईला पाकिस्तानच्या बरोबरीला नेऊन ठेवल्यावर पेटलेले राजकारण आता नव्या वळणावर पोहोचले आहे. हे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप आणि कंगना असे न राहता उत्तर भारत विरुद्ध महाराष्ट्र असे झाले आहे. महाराष्ट्राच्या विरोधात ट्विटरवर जोरदारपणे ट्रेंड चालवला जात आहे.

#महाराष्ट्र_का_CM_नपुंसक_है अशा गलिच्छ शब्दामध्ये हा ट्रेंड चालविला जात आहे. कंगनाने जिस विचारधारा पे श्री बाला साहेब ठाकरे ने शिव सेना का निर्माण किया था आज वो सत्ता केलिए उसी विचारधारा को बेच कर शिव सेना से सोनिया सेना बन चुके हैं, जीन गुंडों ने मेरे पीछे से मेरा घर तोड़ा उनको सिविक बॉडी मत बोलो, संविधान का इतना बड़ा अपमान मत करो. असे लिहून शिवसेनेला आणखी डिवचले आहे. एकूणच कंगना आता राजकीय अजेंड्यावर आल्याचे यानिमित्ताने आणखी ठळकपणे दिसायला लागले आहे.

त्याचवेळी ट्विटरवर उत्तर भारतीयांनी महाराष्ट्र आणि राज्यातील मुख्यमंत्री यांच्याबाबत गलिच्छ शब्दप्रयोग करीत ट्रेंड आणला आहे. एकूणच यानिमित्ताने देशभरात बेरोजगारी, करोना विषाणूचे अनारोग्य आणि इतर महत्वाच्या मुद्यावरील लक्ष कमी होऊन कंगना-एके-कंगना असेच चित्र तयार केले जात आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here