कंगनाला पाठींब्यासाठी हिमाचलमध्ये आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी केली पाठराखण आणि शिवसेनेवर टीका

अभिनेत्री कंगना राणावत यांच्या महाराष्ट्रविरोधी वक्तव्यावरून पेटलेले राजकारण आणखी गतिमान झालेले आहे. कंगना राणावत ही मुळची हिमाचल प्रदेश मधील मंडी येथील आहे. तिच्या समर्थनार्थ तिथे चाहत्यांनी आंदोलन केले आहे. तर, राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून तिला पाठींबा दिला आहे.

ठाकूर यांनी लिहिले आहे की, हम हिमाचल की बेटी का अपमान सहन नहीं कर सकते। महाराष्ट्र सरकार ने हिमाचल की बेटी कंगना रणौत के साथ जो राजनीतिक प्रतिशोध की भावना से अत्याचार किया है यह अत्यंत चिंताजनक एवं निंदनीय है। हमारी सरकार व देश की जनता इस घटनाक्रम में हिमाचल की बेटी कंगना के साथ खड़ी है।

एकूणच कंगनाच्या पाठीमागे भाजप आणि आता हिमाचल प्रदेश या राज्यानेही ताकद उभी केली आहे. त्यामुळे आता याचे राजकारण पुढचे कोणते वळण पकडते याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. कंगणाचे कार्यालय मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी पडल्याने आता यातील घडामोडी आणि राजकारण तेजीत आलेले आहे. महाराष्ट्र भाजपनेही केंद्रीय भाजपच्या समवेत जात महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या या अभिनेत्रीची बाजू घेतली आहे. त्यामुळे राज्यात या प्रकरणाची हवा आणखी काही कालावधीसाठी राहण्याची चिन्हे आहेत.

संपादन : सचिन पाटील

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here