मुंबई :
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत चालू असलेल्या वादाची सध्या देशभरात चर्चा आहे. या प्रकरणाच्या मुळाशी काहीतरी राजकीय कारस्थान असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील पक्षांनी या प्रकरणात उघड भूमिका घेतल्या आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे कंगना रनौतच्या भेटीला गेले आहेत.