‘हा’ तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान : कॉंग्रेस

मुंबई :

सध्या महाराष्ट्रात कंगना आणि शिवसेना वाद चर्चेत आहे. कंगनाने अनेक ठिकाणी मुंबईविषयी विधान केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अरे-तुरे भाषा वापरली आहे. त्यामुळे हा वाद आता अजूनच चिघळण्याची शक्यता आहे. अशातच कॉंग्रेसने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, कोणी पूर्वीचा अट्टल ड्रगअॅडिक्ट मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करतय, स्वतःच्या कार्यालयाला राम मंदिर म्हणतय तरीही भाजपा समर्थन करते? हा तर महाराष्ट्रासकट भगवान श्रीरामाचाही अपमान आहे. तोंड कोणाचेही असले तरी शब्द भाजपाचेच आहेत.

पुढे बोलताना सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काल भाजपा संचालित एक चॅनेलने काही लोकांना जमवून निदर्शने करवणे, मोदी सरकारने तातडीने संरक्षण देणे, यातून सत्तापिपासू भाजपाचे षडयंत्र साफ दिसत आहे. महाराष्ट्रद्रोही भाजपला महाराष्ट्र माफ करणार नाही. गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

सावंत यांनी केलेल्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. यावर बी.बी. पाटील यांनी म्हटले आहे की, भाजप भावनिक राजकारण करते म्हणून बोंब मारणारे तुम्ही काँग्रेसी लोक काय दुसरं करत आहात? शेतकरी, कोरोना, मराठा आरक्षण, सारथी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जनतेला फाट्यावर मारायचे काम चालू आहे.

संपादन : स्वप्नील पवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here