इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अस्त्राजेनेका ही कंपनी कोविड १९ वरील लस विकसित करीत आहे. जगभरात याच्या ट्रायल चालू आहेत. अशावेळी भारतातही पुण्यातील सिरम इंस्टिट्यूट यांच्यातर्फे याच्या ट्रायल चालू आहेत. त्याबद्दल त्यांनी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांच्या नोटीसला उत्तर दिले आहे.
इंग्लंडमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोखण्याचा निर्णय ऑक्सफर्डने घेतला आहे. कारण, चाचणीदरम्यान तिथे एकाला डोस दिल्यावर त्याला काही गंभीर दुष्परिणाम दिसलेले आहे. संबंधित व्यक्तीची तब्बेत बरी असून त्याला रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. मात्र, त्या व्यक्तीला नेमके कशामुळे असे दुष्परिणाम दिसले हे सपष्ट न झाल्याने जगभरात चाचण्या बंद करण्याच्या सूचना ऑक्सफर्डने दिलेल्या असल्याचे समजते.
ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.
त्याचवेळी सिरम इंस्टिट्यूट यांच्यातर्फे भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या चालूच होत्या. त्यावर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी नोटीस पाठवली होती. सिरम प्रशासनाने त्यावर उत्तर दिले आहे. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, आम्ही ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी बांधील आहोत. आम्ही कोणत्याही नियमांची पायमल्ली केलेली नाही. ऑक्सफर्डकडून चाचणी बंद करण्याबाबत अजूनही कळवलेले नाही. मात्र, जर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी तसे निर्देश दिले तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत.
एकूणच ऑक्सफर्डच्या लसकडे अवघ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. त्यात अशी नकारात्मक बातमी आल्याने जगभरातून काळजी व्यक्त होत आहे. या लास्द्वारे होणारे दुष्परिणाम काढून टाकून तातडीने लस आणून या वाढत्या करोना प्रकोपाला रोखण्याचे आव्हान जगासमोर आहे. सिरम कंपनीला लसचे भारतात उत्पादन करण्याची जबाबदारी मिळालेली आहे.
संपादन : सचिन पाटील