कन्झुमर सेक्टरमधील ‘त्या’ कंपन्या देऊ शकतात बंपर ग्रोथ; इन्व्हेस्टरांनो, वाचा महत्वाची माहिती

क्रेडीट सुइस यांनी कन्झुमर सेक्टरमधील चार कंपन्या भविष्यात उत्तम परतावा देऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार दिग्गज ब्रांड असलेल्या या कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांची यादी आणि कंपनीचा ताळेबंद पाहून आपणही याबाबतचा निर्णय घेऊ शकता.

सध्या ४९५ च्या दरम्यान असलेल्या डाबर इंडिया यांचा शेअर ५७५ रुपये इतकी क्षमता गाठू शकतो. हेल्थकेयर पोर्टफोलियोमध्ये होत असलेली वाढ आणि डाबर कंपनीचे बदलते मार्केटिंग धोरण यामुळे हा शेअर ही पातळी गाठू शकतो असा रेडीत सुइस यांचा अंदाज आहे. तर, होम आणि पर्सनल केयर सेगमेंट यामध्ये दमदार कामगिरी करीर असलेल्या गोदरेज कन्झुमर कंपनीचेही भवितव्य उत्तम राहण्यचा अंदाज लक्षात घेऊन सध्या ६६९ वर असलेल्या या शेअरची किंमत ८३० पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

यासह ३६७ वर असलेल्या इमामी कंपनीचा शेअरही उत्तम कामगिरीसह ४६० रुपये इतक्या उंचीवर जाण्याचा अंदाज आहे. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचा सध्या २१३० रुपयांवर असलेला शेअर पुढील कालावधीत किमान ५ ते ७ टक्के इतका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. ५२ आठवड्यात २६१४ इतक्या जास्त उंचीवर असलेला हा शेअर वाढण्यासाठी भले जास्त वेळ घेईल. मात्र, त्याची वाढण्याची क्षमता खूप जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

वरील माहिती ही सुप्रसिद्ध अर्थपत्र इकॉनॉमिक टाईम्स यांच्याकडे ऑनलाईनला प्रसिद्ध झाली आहे. आपणही फ़क़्त या आकड्यांवर विश्वास ठेवून गुंतवणूक न करता कंपनीचे धोरण, मार्केटची स्थिती आणि ग्राहकांची गरज यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय घेऊन कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करावी.

संपादन : सचिन मोहन चोभे

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here