‘या’ कंपनीचा जबरदस्त प्लान : अवघ्या ४९ रुपयांत २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग

मुंबई :

सध्या मोबाईल आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. रोज लोकांना आवडतील, परवडतील असे प्लान समोर आणले जात आहेत. खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने एक जबरदस्त प्लान आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. अवघ्या ४९ रुपयांमध्ये मिळणारा हा स्वस्तात मस्त प्लान आणत BSNLने कंपनीने मोठा धमाका केला आहे.

असा आहे STV-49 प्लान :

१) स्पेशल टॅरिफ व्हाऊचर २ जीबी डेटा

२) कॉलिंगसाठी १०० फ्री मिनिट्स

३) फ्री मिनिट्स संपल्यानंतर प्रति मिनिट ४५ पैसे दराने चार्ज केले जाणार.

४) १०० फ्री एसएमएस

५) प्लानची वैधता २८ दिवसांची

प्लानला अॅक्टिवेट करण्यासाठी सेल्फकेयर कीवर्ड ‘STV COMBO 49’ असे आहे. हा प्लान कंपनी ९० दिवसांसाठी ऑफर करीत आहे. एवढा स्वस्त आणि दमदार प्लान आपल्या ग्राहकांना देणारी सध्या BSNL ही एकमेव कंपनी आहे. १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत दिले जाणारे BSNLकडे ३ प्लान आहेत. ४९, ९४ आणि ९५ रुपयांचे असे एकूण ३ प्लान सध्या BSNL आपल्या ग्राहकांना देत आहे. ९४ आणि ९५ रुपयांचे प्लान कंपनीने जुलै मध्ये लाँच केले होते. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here