हिडिंग वाचून जरासे हायसे वाटले असेल ना.. होय, वाटायलाच पाहिजे की.. सध्याच्या चीन-भारत तणावाच्या काळात ही एक गुड न्यूज आहे. M-109A6 Paladin ट्रैक्ड होवित्जर 155 मिलीमीटर तोफगोळ्याने एका मिसाईलच्या चिंध्या केल्या आहेत. अमेरिकेत ही घटना घडली आहे. तोफगोळ्याने BQM-167 क्रुज मिसाईल फोडण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे.
सुप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने ही महत्वाची बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, साय-फाय सिनेमा किंवा व्हिडिओ गेममध्ये जसे घडते तसाच हा प्रकार घडला आहे. अडवांस्ड बैटल मैनेजमेंट सिस्टम (ABMS) आर्टिफिशल इंटेलिजेंस यांच्यातर्फे केलेल्या या चाचणीला हे यश मिळाल्याने अनेकांना सुखद धक्का बसला आहे.
चीनकडे सध्या १३०० रॉकेट आणि क्रुज मिसाईल आहेत. ज्यांच्या जीवावर त्यांची खुमखुमी वाढली आहे. मात्र, अशी रॉकेट आणि मिसाईल फ़क़्त एकाच तोफेच्या गोळ्याला बळी पडू शकतात. भारताकडेही अशाच पद्धतीच्या दमदार तोफा आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात घेतलेल्या त्या तोफा कितीही बदनाम झाल्या तरीही त्यांनी कारगिल युद्धात मोठी भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले होते. आताही या तोफा भारताला खूप उपयोगी ठरू शकतात हे अमेरिकेतील या नव्या बातमीने सिद्ध झालेले आहे.
संपादन : सचिन पाटील