स्वामी अग्निवेश यांची तब्बेत बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू

आर्य समाजाचे नेते आणि समाजसेवक स्वामी अग्निवेश यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लिवर सिरोसिसने ग्रस्त असलेल्या स्वामींवर मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे इंस्टिट्यूट ऑफ लिवर एंड बायिलरी साइंसेज (आईएलबीएस) येथे आयसीयूमध्ये उपचार केले जात आहेत.

नवभारत टाईम्स या आघाडीच्या हिंदी दैनिकाने बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे. सामाजिक मुद्द्यांवर आग्रही भूमिका मांडणाऱ्या स्वामीजींनी १९७० मध्ये आर्य सभा नावाची राजकीय पार्टी स्थापन केली होती. १९७७ मध्ये ते हरियाना विधानसभेत आमदार बनले होते. त्यावेळी स्थापन झालेल्या सरकारमध्ये ते शिक्षण मंत्री होते.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

पुढे १९८१ मध्ये त्यांनी बंधुआ मुक्ति मोर्चा नावाची संघटना स्थापन केली. २०११ मध्ये त्यांनी अन्न हजारे यांच्या दिल्ली येथील आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. पुढे सरकारमध्ये बदल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या धोरणावर त्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली होती. सामाजिक हितासाठी त्यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला जाब विचारण्याचे काम केले. बिग बॉस या रियालिटी शोमध्येही ते सहभागी झाले होते.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here