ब्रेकिंग : म्हणून ब्रिटीश न्यायालयात मोदींच्या बाजूने साक्ष देणारेत मार्केंडेय काटज्यू..!

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया यांचे माजी चेअरमन मार्केंडेय काटज्यू यांनी सुप्रसिद्ध उद्योजक निरव मोदी यांच्या बाजूने ब्रिटीश न्यायालयात लिखित साक्ष देणार आहेत. भारतात मोदी यांच्यावर योग्य पद्धतीने खटला चालवला जाणार नसल्याचे त्यांनी लेखी भूमिकेत म्हटले आहे.

आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारांसाठी आणि भूमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मार्केंडेय काटज्यू यांनी याबाबत इकॉनॉमिक टाईम्स या सुप्रसिद्ध अर्थापत्राला माहिती दिली आहे. फोनवरून त्यांनी ही माहिती कळवल्याचे मार्केंडेय काटज्यू यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत भूमिका मांडताना म्हटले आहे की, त्यांनी निरव मोदी या आर्थिक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या उद्योजकास भारतात प्रत्यार्पित न करण्याची गरज व्यक्त करताना भारत सरकारच्या अशा याचिकेचा विरोध नोंदवला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, उद्या ब्रिटीश न्यायालयात व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे माझी साक्ष नोंदवणार आहे. यापूर्वीच माझी लेखी भूमिकाही मी पाठवून दिली आहे. सध्या त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यावर काहीही बोलणार नाही. मात्र, भारतात निरव मोदी यांना न्याय मिळण्याची खूप शक्यता वाटत असल्याचे ब्रिटीश न्यायालयास मी सांगणार आहे. आपल्याकडे आता निष्पक्ष न्याय मिळण्याची खूप कमी शक्यात आहे. मिडीया ट्रायल आणि माध्यमांनी अगोदरच निरव मोदी यांना गुन्हेगार करून टाकल्याने मी अशी साक्ष देणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here