बाजरीलाही मिळेना हमीभाव; शेतकऱ्यांची लुट जोरात, सरकार-विरोधक व समित्यांचा ‘बाजार’ जोमात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने यंदा बाजरीला मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १५० रुपये हमीभाववाढ दिली आहे. म्हाणजे यंदाच्या खरीपात उत्पादित झालेल्या बाजरीला किमान २१५० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या बाजारात हा हमीभाव कोणाच्याही ध्यानीमनी नसल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे चालणारी शेतकऱ्यांवर अन्याय करणारी परंपरा यंदाही कायम आहे.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

बाजरी हे महाराष्ट्रातील खरीपाचे प्रमुख पिक आहे. आवडीने बाजरी खाणारे शहरात असतानाही या पिकाला ठोस हमीभाव देण्यात आतापर्यंत सरकारने तत्परता दाखवलेली नाही. त्याचवेळी शेतकऱ्यांनीही त्यासाठी खास आग्रह धरलेला नाही. सध्या बाजारात बाजरीला सरासरी ११०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळत आहे. हा भाव चांगल्या बाजरीचा आहे. खराब बाजरीला तर यापेक्षा खूपच कमी भाव मिळत आहे. फ़क़्त चांगल्या बाजरीच्या भावाची हमीभावाशी तुलना केल्यास शेतकऱ्यांना सध्या प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये कमी भाव मिळत आहे.

बाजारात अशा पद्धतीने शेतीमालाचे भाव पडलेले असतानाही राज्य सरकाराला त्याचे काहीच देणेघेणे नाही. तर, केंद्रातील मोदींच्या सत्तेने केलेल्या कार्याचा गोडवा गाणाऱ्या महाराष्ट्र भाजपलाही याचे सोयरसुतक नाही. बाजार समित्याही नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या बाबतीत मुग गिळून गप्प आहेत. परिणामी बाजरी पिकामध्येही शेतकऱ्यांची आर्थिक लुट जोमात सुरू आहे. हीच बाजरी दिवाळीनंतर बाजारात २२०० रुपये प्रतिक्विंटल किंवा त्यापेक्षाही जास्त विकली जाईल. भाव कमी असताना आणि राजरोस शेतकऱ्यांचा बाजार उठत असतानाही सरकार-विरोधक व समित्या सोयीस्करपणे डोळेझाक करीत आहेत. तर शेतकरी बापुडा असल्याचे मनात घेऊन हा अन्याय निमूटपणे सहन करीत आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

गुरुवारी (दि. १० सप्टेंबर २०२०) राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील बाजरी पिकाचे प्रतिक्विंटल रुपयातील भाव असे :

बाजार समितीकिमानकमालसरासरी
औरंगाबाद१०००१३००११५०
सिल्लोड१०००१२५०१२००
जालना११२५१४००१२७५
चोपडा१०२५१२७५११९१
पैठण९००१४५०१०८०
दौंड१३००१४००१३२५
देवळा१०१२१०६५१०६५
धुळे१०००१३००११४५
माजलगाव१०००१६१८१५००
शेवगाव१०००११००११००
मुंबई२२००२८००२५००
अमळनेर९७०१२९११२९१
जामखेड११००१२००११५०
देऊळगाव राजा११५०१२००१२००
पुणे२३००२७००२५२०
बीड१०००१७००१५००
लासूर स्टेशन१०४०१२६५११२५
शिरूर८५०१२५०११००

स्त्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here