तिच्यामंधी.. त्या ठिकाणी कश्यप-कामरांनी दिले अर्णब गोस्वामींना ‘हे’ अवार्ड; आणि मुद्दा झाला ट्रोलही

पत्रकारिता कशी करू नये याचा वस्तुपाठ अनेकजण सध्या भारतात घालून देत असतात. रिपब्लिक टीव्हीचे (संपादक किंवा पत्रकार हा शब्द इथे जाणीवपूर्वक लिहिलेला नाही. कारण, त्या शब्दांचा मग अपमान होईल. त्यामुळे अर्णब सरांची माफी मागून हे शब्द गाळलेले आहेत) अर्णब गोस्वामी म्हणजे त्या सर्वांचे महामेरू. त्यांनाच आज ‘डेमोक्रसीबचाव’वाल्या दोघांनी एक खास गिफ्टवजा अवार्ड दिले आहे. हा मुद्दा सध्या सोशल मिडीयामध्ये जोरात ट्रेंडमध्ये आहे.

सुप्रसिद्ध (आणि देशप्रेमी असल्या किंवा नसल्याचे दाखले वाटणाऱ्यांच्या दृष्टीने कुप्रसिद्ध असल्याने त्या देशप्रेमी बांधवांची माफी मागतो अगोदरच) चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा आज वाढदिवस आहे. अशावेळी त्यांचा मित्र असलेला आणि लोकशाहीसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या सुप्रसिद्ध कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी आणखी एक नसती डोकेदुखी करणारा वाढीव प्रकार केला आहे. त्यांनी आज रिपब्लिक टीव्ही येथे जाऊन अर्णब यांना प्रत्येकी एकेक फोटोफ्रेम भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फोटोही त्यांनी पुरावा म्हणून फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

कामरा-कश्यप या दोघांनीही कॉमेडी करण्याची हद्द करीत पत्रकारितेच्या हद्दीच्या पल्याड जाऊन भूमिका घेणाऱ्या अर्णब यांना थेट चप्पल मढवलेल्या फ्रेम देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्णब आणि पत्रकारिता यांचा संबंध फ़क़्त म्हणण्यापुरताच असल्याने अनेक पत्रकारांनी व विचारी नागरिकांनी त्यांच्या या कृतीला समर्थन दिले आहे. तर, अनेकांनी या ‘निषेधार्ह’ घटनेचा निषेध केला आहे. एकूणच अर्णब गोस्वामी हे यानिमित्ताने आज पुन्हा एकदा सोशल मीडियामधील स्टार बनले आहेत.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

रिपब्लिक टीव्ही किंवा अर्णब सरांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही ना त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. कश्यप-कामरा या दोघांनाही गेटवरच रोखण्यात आल्याचे समजते. एकूणच या दोघांनीही एका वेगळ्या स्टाईलने पत्रकार नसलेल्या माणसाचा खास पद्धतीने निषेध करण्याचा हा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते अनेकांच्या कौतुकाचे आणि काहींच्या टिकेचेही धनी बनले आहेत. कृषीरंग टीम मात्र या दोन्ही ‘महाभागां’चे ना अभिनंदन करीत आहे ना त्यांचा निषेध करीत आहे. जे वास्तव सोशल मिडीयामध्ये दैस्त आहे तेच मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.. इतकेच..!

लेखक : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here