ओल्या शेंगाही खातायेत भाव; पहा राज्यभरातील बाजार समितीमधील आकडेवारी

खरीप हंगामात पेरलेल्या भुईमुग पिकाच्या काढणीचा सीजन सध्या राज्यभरात जोमात चालू आहे. करोनाच्या संकटातही शेतकरी आणि कष्टकरी महिला ओल्या भुईमुग शेंगा काढीत आहेत. या शेंगाना खूप चांगला नाही, मात्र बऱ्यापैकी भाव मिळत आहे.

करोनामुळे यंदाही सर्वच पिकांच्या भावामध्ये तितकीशी तेजी नाही. वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही. त्यातच सार्वजन भीतीच्या सावटाखाली सामाजिक व आर्थिक व्यवहार करीत आहेत. त्यामुळे बाजारात तितकीशी चलती नाही. मात्र, तरीही शेतकरी याला थेट भिडून बाजारात आपला शेतमाल विक्रीला नेट आहे. सोमवार ते गुरुवार (दि. ७ ते १० सप्टेंबर २०२०) या कालावधीतील महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगांना मिळालेला भाव (आकडेवारी रुपये / क्विंटल) असा :

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

ओल्या शेंगा

बाजार समितीकिमानकमालसरासरी
मुंबई४०००५०००४५००
अमरावती३५००४०००३८००
पुणे३०००४०००३५००
चंद्रपूर३०००४५००४०००
श्रीरामपूर२५००३५००३०००
मंचर३५००३५००३५००
नावापुर२५००२५००२५००

वाळलेल्या शेंगा (दि. १० सप्टेंबर २०२०)

बाजार समितीकिमानकमालसरासरी
अमरावती४३००४७००४५००
औरंगाबाद२५००३५००३०००
भोकर४५००४५००४५००
कारंजा२६००४५००३०००
नागपूर३०००३५००३३७५
अमळनेर३९००४५००४५००
काटोल३५००५३००५१५०
धुळे३५००५१००४५००

स्त्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे

संपादन : माधुरी सचिन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here