ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहयोगाने बनवली जात असलेल्या astrazeneca या करोना विषाणूवरील लसच्या क्लिनिकल ट्रायल भारतातही बंद करण्यात आलेल्या आहेत. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया यांनी याची अधिकृतरीत्या माहिती दिली आहे.
इंग्लंडमध्ये एका व्यक्तीला लस दिल्यावर काही दुष्परिणाम आढळले होते. त्यामुळे तिकडे आणि एकूणच जगभरात या लसच्या ट्रायल बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यातच भारतात काहीही दुष्परिणाम न दिसल्याने याच्या ट्रायल कालपर्यंत चालू होत्या. मात्र, अखेरीस ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) यांनी नोटीस दिल्यावर आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सिरमने लसच्या ट्रायल पुढील निर्देश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
संपादन : सचिन पाटील