रोज ‘इतक्या’ तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घातल्यास ‘हे’ होतील दुष्परिणाम

टेक्नोलॉजीचे जसे फायदे आहेत तसेच तोटेसुद्धा आहेत. जेवढा जास्त गैरवापर टेक्नोलॉजीचा होतो तेवढे जास्त तोटे आपल्याला दिसून येतात. मागच्या वर्षी मोबाईलच्या अतिवापरामुळे तब्बल १८ वर्षाखालील २२ मुलांना वेड लागल्याची घटना समोर आली होती. होय, ही माहिती काही बंडल नाही. हे वास्तव आहे.

आपल्या सर्वांना मोबाईल आजकाल श्वासाइतकाच प्रिय झाला आहे. मात्र, पाच तासांपेक्षा जास्त काळ स्मार्टफोन वापरल्याने तुम्ही स्थूलतेला बळी पडू शकता, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. त्यात पुढे इतरही काही मुद्दे दिलेले आहेत. आपण हे वाचा आणि शक्यतो मोबाइलवर जास्त वेळ घालण्याचे कमी करा.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

हे आहेत महत्वाचे तोटे :

  • स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाल मंदावते. परिणामी स्थूलता वाढते.
  • स्थूलतेसोबतच हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यताही वाढते.
  • मधुमेह, हृदयविकार, विविध प्रकारचे कर्करोग, अपमृत्यू होण्याची शक्यता वाढत असल्याचंही संशोधनात समोर आलं आहे.
  • पाच तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ स्मार्टफोन वापरल्याने स्थूल होण्याची शक्यता 43 टक्क्यांनी बळावते.

‘मोबाईल हा ज्ञान, मनोरंजन, माहितीचा आकर्षक साठा आहे. त्यामुळे तरुणाईला त्याकडे ओढा वाटणं साहजिक आहे. परंतु तरुणवर्गाने आरोग्यापूर्ण सवयी सुधारण्याकडेही लक्ष द्यावं’ असं मत एसीसी लॅटिन अमेरिका कॉन्फरन्समध्ये याविषयीचं संशोधन सादरकर्त्या मिरारी मँटिला यांनी व्यक्त केलं.

संपादन : विनोद सूर्यवंशी

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here