मुंबई :
गळफास घेऊन आत्महत्या केली की खून झाला यावरून सुरू झालेली चर्चा आता थेट अमलीपदार्थ या विषयावर केंद्रित झाली आहे. सुशांत सिंग राजपूत याच्यावरील राजकारण आणि पोलीस तपास वेगळे वळण घेत आहे. त्यातच आता NCB पथकाने वापरलेली एक गाडी यामध्ये चर्चेत आलेली आहे. एकूणच या केसचा गोंधळ वाढत आहे.
यावरून पत्रकार ब्रह्मा चट्टे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, खाली तुम्ही फोटो पाहत आहे तर तो फोटो पोस्ट केलाय टीव्ही नाईन मराठीचे कॅमेरामन कल्पेश हडकर याने. आणि कल्पेश ने पुढे चार ओळी लिहिल्या आहेत. “SSR प्रकरणी दिल्लीतून मुंबईत ड्रग्स ची चौकशी करायला आलेल्या NCB पथकाच्या अधिकाऱ्यासाठी कमळाची गाडी…”
पुढे ते लिहितात की, कल्पेश हा कॅमेरा पर्सन आहे पण त्याच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. कल्पेश बद्दल मी पुढे कधीतरी लिहिन कारण कल्पेश सोबत मी काम केले आहे. एक धाडसी कॅमेरा पर्सन म्हणून कल्पेश ओळखला जातो. याठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मुंबईमधल्या मोठ्या मोठ्या माध्यमांच्या पत्रकार म्हणून घेणाऱ्यांना आणि मंत्रालयात लय मोठा पत्रकार असल्याचा आव आणत स्पेशल ट्रीटमेंटची अपेक्षा बाळगणाऱ्या कोणत्याही प्रतिनिधीच्या लक्षात ही बाब अशी कशी आली नाही.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी चौकशी करायला आलेल्या NCB पथकाच्या अधिकाऱ्यांकडे आपल्या गाडी वरचे चिन्ह बघितल्यावरच या सगळ्या प्रकरणाचा अंदाज लक्षात येतो. आणि या प्रकरणात माध्यमांनी घेतलेली भूमिकाही खूप काही सांगून जाते, असे लिहून ते म्हणतात की या प्रकरणात #सबगोलमाल चालू आहे.
ऋतुराज देशमुख यांनी चट्टे यांच्या पोस्टवर खाली प्रतिक्रिया देताना सर्वप्रथम हा फोटो ANI वृत्तवाहिनीचे पत्रकार रणजीत सिंग यांनी ट्विटरवर टाकल्याचे म्हटले आहे. एकूणच यामध्ये नेमके खरे काय, खोटे काय आणि राजकीय मालमसाला भरलेला असण्याची शक्यता काय हाच प्रश्न आणखी गहन होत आहे.