म्हणून पवारांच्या बारामतीत घेतला ‘तो’ निर्णय; वाचा महत्वाची बातमी

सध्या राज्यभरात खेडोपाडी करोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झालेली आहे. एकूण सरकारी व्यवस्थेची अवस्था बिकट असल्याचे यानिमित्ताने वेळोवेळी सिद्ध होत आहे. अशावेळी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या बारामतीतही लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.

बारामतीत सोमवारपासून ७ दिवसांची टाळेबंदी लागू झालेली आहे. वाढते करोना रुग्ण लक्षात घेऊन नागरिकांचा एकमेकांशी येणारा संपर्क कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात कोरोनाचा धोका काही कमी शक्यता वाटत नाही. रोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नवेनवे उच्चांक यानिमित्ताने समोर येत आहेत. राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत असल्याने रुग्ण वाढीच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. मात्र, राज्यातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आता टाळेबंदी करण्यावर अनेकजण साशंकता व्यक्त करीत आहेत.

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

टाळेबंदी करूनही करोनाचे संक्रमण रोखण्यात आपण सगळे कमी पडलो आहोत. त्यामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. मात्र, तरीही प्रशासनातील धुरिणांना यातून नेमका काय मार्ग काढावा हेच सुचत नसल्याने पुन्हा-पुन्हा टाळेबंदीचा राग आळवला जाता आहे. बारामती शहरात आतापर्यंत 1400 हुन अधिक सापडतानाच त्यातील 48 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बारामतीतील मेडिकल आणि दुध वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 9 लाख 7 हजार 212 वर गेली आहे. राज्यात 2 लाख 35 हजार 857 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भारतातही कोरोना रुग्णांचा संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर 80 हजारांच्यावर नवे रुग्ण सापडत आहेत. एकूण परिस्थिती भयावह आहे आणि ती कधी निवळणार याचे उत्तर केंद्र किंवा राज्य सरकारी धुरिणांना सापडत नाही, हे वास्तव आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता.क. : करोना विषाणूबाबत माहितीसाठी आरोग्य मंत्रालयाच्या +91-11-23978046 किंवा ncov2019@gmail.com &ncov2019@gov.in या विशेष हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here