राधाकिसन दमानी यांनी घेतलेत NSE चेही शेअर; पहा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये नेमके काय आहे ते

अॅव्हेन्यू सुपरमार्केटचे मालक राधाकिसन दमानी हे नाव आता भारतीयांना खूप परिचयाचे झालेले आहे. शेअर बाजारातील दिग्गज इन्व्हेस्टर, डीमार्ट कंपनीचे संस्थापक आणि विशेष प्रकाशझोतात न येता आपले काम करीत राहणारे उद्योजक अशीच त्यांची ओळख आहे. त्याच दमानी यांनी आता NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्येही ७८ लाख शेअर घेतले आहे.

NSE ने त्यांच्या शेअरहोल्डरची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार दमानी यांच्याकडे आता याचे १.७८ टक्के इतके शेअर आहेत. त्यामुळे दमानी ही आता NSE चे शेअर असलेल्या २०० लोकांच्या यादीत गेले आहेत. याचे शेअर आणखी ४० संस्थांकडे आहेत. NSE मध्ये सर्वाधिक वाटा भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी) यांचा आहे. त्यांच्याकडे १२.५ टक्के शेअर आहेत. तर, भारतीय स्टेट बँक, आईसीआईसीआई बँक, एचडीएफसी, सिटीग्रुप, मॉर्गन स्टेनले आणि गोल्डमैन सैक्स यांचीही यामध्ये गुंतवणूक आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

राधाकिसन दमानी यांची ओळख दीर्घकालीन गुंतवणूक करणारे म्हणून आहे. एकदा घेतलेले शेअर खूप वर्षांसाठी ठेवण्याची त्यांची पद्धत आहे. सध्या त्यांच्याकडे अॅव्हेन्यू सुपरमार्केटचे ७४.९ टक्के, इंडिया सिमेंट कंपनीचे २०.४ टक्के, व्हीएसटी इंडस्ट्रीज यांचे २६ टक्के, ब्ल्यू डार्ट यांचे ४.४ टक्के आणि स्पेन्सर्स रिटेल यांचे २.१ टक्के इतके शेअर आहेत.

NSE लवकरच बाजारात आपला आयपीओ घेऊन येत आहे. सामान्य गुंतवणूकदारांचे त्याकडे लक्ष आहे. देशातील सर्वात मोठा शेअर बाजार प्लॅटफॉर्म असलेल्या NSE मध्ये गुंतवणूक करायला अनेकांना आवडणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here