अशा पद्धतीने त्यांनी खाल्ले ११० कोटी; PM किसान योजनेच्या घोटाळाप्रकरणी १८ जणांना अटक

कोणत्याही योजनेमध्ये कसा भ्रष्टाचार करायचा यावर पीएचडी झालेले भारतात कोट्यवधी सापडतील. अशाच महाभागांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान योजनेचे १२० कोटी रुपये खाल्ल्याचे धक्कादायक प्रकरण पुढे आलेले आहे. याप्रकरणी आतापर्यंत तामिळनाडू राज्यात १८ जणांना अटक करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना मदतीसाठी सुरू झालेल्या या योजनेतून लाखो शेतकरी अजूनही वंचित असतानाच अनेक बोगस लाभार्थी या योजनेचा पैसा भ्रष्ट मार्गाने खात आल्याचे पुढे आलेले आहे. एकूण ११० कोटीपैकी आतापर्यंत ३२ कोटींची वसुली करण्यात आलेली आहे. मात्र, अटक केलेले सगळेच मधले एजंट आहेत. आतापर्यंत प्रशासनाने किंवा पोलिसांनी एकही जबाबदार अधिकाऱ्याला अटक करण्याची धमक दाखवलेली नाही.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

या महाभागांनी बोगस लाभार्थी तयार करून एजंटच्या मार्फत त्यांचे अर्ज भरून घेतले. अधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिली. मंजुरी दिल्यावर मग संबंधित बोगस लाभार्थ्यांना केंद्र सरकारचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याकडून २००० रुपये घेतले जात होते. त्यासाठीचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड दलालांकडेच होते. त्यांनी तामिळनाडू राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने हजारो बोगस लाभार्थी करून ठेवले होते.

शेतकऱ्यांच्या स्कीममध्ये अशा पद्धतीने बोगसगिरी करणाऱ्या ८० अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ तर, ३४ अधिकाऱ्यांना निलंबित केलेले आहे. आता याची चौशाशी सुरू असून याप्रकरणाची व्याप्ती आणखी कुठे आहे याचाही शोध घेतला जात आहे. प्रमुख सचिव गगनदीप सिंह बेदी यांनी याबाबत म्हटले की, लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वाढलेली संख्या लक्षात आल्याने याचे बिंग फुटले.

संपादन : सचिन मोहन चोभे

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here