धक्कादायक : जगाला मोठा झटका; म्हणून ऑक्सफर्डच्या लसचे ट्रायल रोखावे लागले

जगाचे सर्वात जास्त लक्ष लागलेल्या इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे विकसित लसच्याबाबत वाईट बातमी समोर येत आहे. या लसचे तिसत्या टप्प्यातील ट्रायल रोखण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हा संपूर्ण जगाला मोठा धोका आहे.

AZD1222  ही लस तिसऱ्या टप्प्यात आहे. अशावेळी ही चाचणी रोखण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एका व्यक्तीला ही लस दिल्यावर गंभीर लक्षणे दिसायला लागल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता त्या रुग्णाची चाचणी करून त्याला नेमके कशामुळे असे झाले हे शोधले जाणार आहे. जर, लसमुळे असे काही झालेले असल्यास मग मात्र या लसबाबत पुनर्विचार करावा लागणार आहे.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

 ब्रिटिश-स्वीडिश कंपनी एस्ट्राजेनिका यांच्या या लसकडे अवघ्या जगाचे डोळे कागलेले आहेत. अनेकांनी आम्हीच लस बनवल्याचा दावा केला आहे. मात्र, ऑक्सफर्डतर्फे येणारी लस सर्वोत्तम असणार अशीच जगभरात भावना आहे. त्यामुळे ही लस कधी एकदा आपल्याला मिळते याचीच सगळेजण वाट पाहत आहेत. ऑक्सफर्डनेही जानेवारी-फेब्रुवारी २०२१ पर्यंत लस येईल असे म्हटले होते. मात्र, एकाला यामुळे गंभीर दुष्परिणाम दिसल्याने आता चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

विद्यापीठातील सूत्रांनी माहिती दिली आहे की, सध्या संबंधित रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहे. टीम त्यावर लक्ष ठेऊन आहे. तो रुग्ण लवकरच बरा होण्याची अपेक्षा आहे. अशा पद्धतीने चाचण्या रोखल्या जाण्याचे तितकेसे महत्वाचे नाही. याच्या कारणांच्या मुळाशी जाऊन आपण यातून मार्ग काढणे हे महत्वाचे आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता.क. : करोना विषाणूबाबत माहितीसाठी आरोग्य मंत्रालयाच्या +91-11-23978046 किंवा ncov2019@gmail.com &ncov2019@gov.in या विशेष हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here