असा बनवा मस्तपैकी झकास मटन खिमा; रेसिपी ‘त्यांना’ही पाठवा की

मटन खिमा हा पदार्थ सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये जाऊन खाण्यास लोकांचे आवडते. कारण, घरी असा मस्त पदार्थ आपल्याला नीट बनवता येईल की नाही याचा न्युनगंड असतो. मात्र, आज आपण सगळेच त्यावर मात करूया. घरीच असा झकास चवदार पदार्थ करून खाऊया आणि मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांनाही खाऊ घालूया.

ही रेसिपी वाचून तुम्ही घरी मटन खिमा बनवलात तर नेहमीच घरीच बनवून खाणार. कारण घरच्या मटन खिम्याची चव काही और आहे. नव्हे तो फ़क़्त चवदार नाही, तर ताब्बेतीसाठीही दमदार असणार आहे.. त्यासाठी साहित्य काय लागते असा प्रश्न पडलाय का? हरकत नाही, ही खालची यादी वाचून घ्या त्यासाठी.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

मटण खिमा १/२ किलो
४ मोठे कांदे बारीक चिरुन
२ मध्यम टॉमाटो बारीक चिरुन
आल-लसुण-मिरची-कोथिंबिर पेस्ट (आवडीप्रमाणे)
२ तमालपत्र
५-६ मिरी दाणे
तेल / गावरान तूप
हळद
लाल तिखट
गरम मसाला
मिट मसाला (कोणत्याही चांगल्या कंपनीचा)
मीठ
बारीक चिरलेली कोथिंबिर

आता हे साहित्य घेतले असेल तर बनवायला पण घ्या की हा भन्नाट पदार्थ. आहो, हे सांगतानाही मला तोंडाला पाणी सुटलेय. समोर मस्त खिमा दिसतोय.

प्रथम खिमा, थोडी हळद आणि आले-लसुन पेस्ट (१/२ चमचा) टाकुन शिजवुन घ्या. कुकरमध्ये टाकणार असल्यास ५ शिट्ट्या तरी होऊ द्या. नंतर बाहेर काढल्यावर खिमा थंड झाला की कढईत तेल घेउन गरम करा. यात मिरी दाणे आणि तमालपत्र टाका. आता कांदा परतुन घ्या. छान गुलाबीसर झाला की मग टोमाटो परतून घ्या. टोमाटो मऊ झाला की यात आवडीप्रमाणे आले-लसुण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, हळद आणि लाल तिखट घालून छान परतून घ्या. मग यात १ चमचा मिट मसाला घाला.


आता त्यात खिमा अ‍ॅड करा. मस्त परतून घ्या. अगदी थोड पाणी घाला आणि वरुन १ चमचा गरम मसाला घाला. छान मिक्स करुन घ्या हे सगळे. मग मीठ घाला. ग्रेव्ही हवी असेल तर त्याप्रमाणे पाणी वाढवा. खिमा आधीच शिजवला असल्याने वेळ कमी लागतो. मंद आचेवर त्याला मस्त शिजू द्या आणि आच बंद करुन मगच वरुन कोथींबीर टाका. अशा पद्धतीने झाला आपला मटन खिमा तय्यार. आता घ्या भाकरी किंवा पाव आणि करा सुरु.. मस्त पोटभर खा की हा खिमा..

ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या त्यांना, तिला, मैत्रिणीला, मित्रांना आणि आप्तेष्टांना पाठवा की..

संपादन : संचिता कदम

होय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…

Posted by लोकरंग L MegaMart on Thursday, March 26, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here