भारत-चीन सीमेवर लडाखमधील भागातील तणाव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस आणखी वाढत आहे. नुकताच पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिलेल्या चीन्यांना धडा शिकवायला भारतीय सैन्याने एका मोक्याच्या टेकडीवर जाऊन शह दिला आहे. त्याने तिळपापड झालेल्या चीनने तिबेटच्या पठारावर युद्धसराव सुरू केला आहे.
अणुबॉम्ब टाकण्याची क्षमता असलेल्या H6 विमानासह रणगाडे आणि इतर शस्त्रास्त्रे यांचा त्या युद्धसरावात समावेश चीन्यांनी केला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला सध्या युद्धाची खुमखुमी असल्यागत ते कुभांड रचित आहेत. त्याचवेळी चीनचे सरकार भारताशी संवादाचे धोरण ठेऊन आहे. एकूणच दोन्ही देशातील आर्थिक आणि राजकीय संबंध त्यामुळे विकोपाला गेले आहेत.
ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.
चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्स यांनीच याच्या बातम्या आणि त्याचे ट्विट केलेले आहे. ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे की, तिबेटच्या पठारावर ४ हजार ९०० मीटर उंचीवर युद्धसराव करण्यात येत आहे. त्यामध्ये अत्याधुनिक विमाने, रॉकेट आणि मिसाईल यांचाही वापर करण्यात आला. पैगोंग झील भाग हा सध्या भारत-चीन सीमेवरील तणावाचे केंद्र बनला आहे. येथील एका महत्वाच्या टेकडीवर भारतीय सैन्य ठाण मांडून बसले आहे.
चीनने भारतीय सैन्य चीनच्या भागात येऊन गोळीबार करीत असल्याचा आरोप करीत आहे. कांगावा करण्यात बहाद्दर असलेल्या चीन्यांची भारतीय सैन्याच्या धडक धोरणामुळे नाचक्की झालेली आहे. भारतानेही चीनी लष्कराकडून गोळीबार केला गेल्याचे म्हटले आहे. एकूणच सीमेवर तणाव आहे. तर, रशियात दोन्ही देशाचे प्रशासकीय अधिकारी आणि प्रमुख नेते या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी बैठका करीत आहेत.
संपादन : सचिन मोहन चोभे