कॅगच्या अहवालावर सारवासारव करण्यासाठी आशिष शेलारांनी मांडले ‘हे’ मत; वाचा भाजपची भूमिका

मुंबई :

फडणवीस सरकारने जवळपास साडेनऊ हजार कोटी रुपयांचा निधी जलयुक्त शिवारच्या कामांसाठी दिला. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही असे म्हणत कॅगने फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या कामांवर ताशेरे ओढले. कॅगचा अहवाल समोर आल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप मंत्र्यांवर लोकांनी सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी सारवासारव करत कॅगच्या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शेलार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, फडणवीस सरकारच्या काळात 6,41,560 जलयुक्त शिवारची कामे झाली आहेत. त्यापैकी 1128 कामांचे निरीक्षण कॅगने केले. केवळ 0.17 टक्के कामांवरून संपूर्ण जलयुक्त शिवारचे मूल्यमापन विश्वासार्ह कसे ठरेल? , असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, कॅगने जलयुक्त शिवारचे मूल्यमापन करताना विशिष्ट भागातील कामांना भेट दिली आहे. कॅगने 99.83 टक्के कामं तपासलीच नाहीत!

शेलार यांनी केलेली ही सारवासारव लोकांच्या लक्षात आलेली आहे. शेलार यांनी केलेल्या ट्वीटवर स्वप्नील महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, वकील आहात ना तुम्ही. Research आणि Audit कस करतात हे माहित नाही काय? आता CAG वर पण विश्वास नाही का तुमचा.

शेलारमामा ,CAG ला काय कळतंय ??? CAG पेक्षा प्रचंडज्ञानी, प्रकांड पंडीत, सगळे तुमच्याकडेच आहेत, असा टोला नेटकरी सोहम यांनी शेलारांना लगावला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here