बिहार निवडणुकीत ट्वीस्ट; लालूंच्या पक्षाला बसणार मोठा झटका..!

सध्या देशभरात बिहार निवडणूक चर्चेत आहे. सध्या कोणतीही निवडणूक नसल्याने आणि हे राज्य खूप महत्वाचे असल्याने तसे होणेही स्वाभाविक आहे. अशावेळी आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या सुनेनेच कुटुंबाच्या विरोधात थेट बंडाचा झेंडा उभारला आहे.

माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांचे पुत्र आणि लालूप्रसाद यांची सून ऐश्वर्या यांचे वडील चंद्रिका राय यांनीच टाईम्स ग्रुपच्या वार्ताहराशी बोलताना ही माहिती दिली आहे. लालूंचे पुत्र तेजप्रताप यांच्या विरोधात ऐश्वर्या निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर बोलताना चंद्रिका राय म्हणाले की, असे करण्यासाठीचा निर्णय ऐश्वर्या घेऊ शकते. कारण, तिला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सर्व काही समजते. त्यामुळे ती जो काही निर्णय घेईल त्याला आम्हीही पाठींबा देऊ.

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

चंद्रिका राय यांनी मुकातच लालूप्रसाद यांना सोडून देत सत्ताधारी जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार यांच्याकडे जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांची मुलगी कोणता निर्णय घेणार याकडे आत राज्याचे लक्ष लागलेले आहे. आमदार असलेले चंद्रिका हे १९८५ पासून विधानसभेत आहेत. सुरुवातीला ते कॉंग्रेसतर्फे आमदार झाले होते. नंतर १९९० मध्ये ते लालूप्रसाद यांना भेटले. आतापर्यंत ते लालूंना साथ देत होते. मात्र, कौटुंबिक ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी नीतिशकुमार यांना गरीबांचा मसीहा घोषित केले आहे.

संपादन : सचिन पाटील

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here