‘अमूल’सारखा अमूल्य ठेवा डॉ. कुरियन यांनी दिला; वाचा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त खास लेख

“अमूल” हे नाव ऐकलं आहे का ? देशाच्या कानाकोपऱ्यात अमुल माहीत नाही असा माणूस सापडणार नाही. भारताचा स्वदेशी दुधाचा ब्रँड म्हणून अमुलला ओळखले जाते. या अमुलला ब्रँड बनवणाऱ्या माणसाची म्हणजेच डॉ. वर्गीस कुरियन यांची आज पुण्यतिथी आहे.

भारतीय दुग्धक्रांतीचे जनक म्हणून डॉ. वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला. त्यांचं शिक्षण हे बी.इ. (यंत्र अभियांत्रिकी) झाले आणि एम.एस्सी. सुध्दा त्याच विषयात केले. ते सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य होते असे नाही तर त्यांचे काका जॉन मथाई भारताचे पहिले रेल्वेमंत्री होते. इ.स. १९४९-५१ या काळात ते भारताचे वित्त मंत्रीदेखील होते. अशा तगड्या कुटुंबातील सदस्य ते होते. मात्र, त्यांनी जे काम केलं ते इतकं जबरदस्त आहे की भारतात आणि जगभरात त्यांची स्वतःची ओळख आहे.

ट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍

Posted by विश्वराज अॅग्रो इंडस्ट्रीज on Sunday, September 6, 2020

कधीही झाडाच्या सावलीत दुसरे झाड मोठे होत नाही असे सांगितले जाते. मात्र, या माणसानं असल्या सगळ्या खुळचट म्हणी, कल्पना आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खोट्या ठरवल्या. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नावाच्या संस्थेचे नाव या माणसानं बदलून १४ डिसेंबर १९४६  रोजी आनंद मिल्क युनियन लिमिटेड असे नामांतर केले. नाव बदलले तसेच कार्यपद्धती पण त्या ठिकाणची बदलली पाहिजे असा ध्यास घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. ज्याकाळी लोकांच्याजवळ वाहने नव्हती, दळणवळणाची साधने नव्हती. त्यावेळी गावोगावी जाऊन त्यांनी लोकांशी संवाद साधला. लोकांना अमुल च्या संस्थेत भागीदारी देऊ केली.

लोकांना फक्त भागीदारी नाही मिळाली तर, चांगल्या प्रकारे काम समजून घेता आले. गावामध्ये अगोदर चांगला भाव मिळत नसे. अमुलमुळे लोकांना खूप चांगला भाव मिळायला लागला. सर्वसामान्य माणसाला अमुल डेअरी ही आपली डेरी आहे असे वाटायला लागलं आणि आपलेपणा ज्या संस्थेच्याविषयी लोकांना वाटतो ती संस्था मोठी झाल्याशिवाय राहत नाही. 

ADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.

याच अमुल कंपनीने डॉ. वर्गीस कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली इतका चांगला टप्पा पार केला की जागतिक दर्जाच्या नेस्ले कंपनीला भारतातील दुग्धपदार्थातील स्पर्धक आजही अमुल वाटतो. आजच्या घडीला जर आपण अमुलचा विस्तार पाहिला तर या कंपनीने जागतिक स्तरावर पण त्याच दर्जेदारपणाने विस्तार केला आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बांगलादेश, मॉरिशस, आखाती देश आणि आफ्रिकेतील काही देश इतक्या ठिकाणी अमुल कंपनीने स्वतः ची ओळख मिळवली आहे. विश्वास मिळवला आहे. आणि ग्राहक सुध्दा मिळवला आहे. 

अमुल या कंपनीला इतक्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या डॉ.वर्गीस कुरियन यांची आज पुण्यतिथी. भारतातील एका कर्तबगार माणसाला त्यानिमित्ताने टीम कृषीरंगतर्फे आदरांजली. संस्था मोठी झाली पाहिजे असा विचार घेऊन संस्था मोठी करणाऱ्या डॉ वर्गीस कुरियन यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

लेखक : सानेश शिंदे (सरकार)

शेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..

Posted by कृषीरंग on Monday, September 7, 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here